जयंती उत्सवाच्या खर्चातून जीवनावश्यक वस्तू वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 12:42 IST2020-04-14T12:42:42+5:302020-04-14T12:42:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना ...

 Distribution of essential items at the expense of Jubilee celebrations | जयंती उत्सवाच्या खर्चातून जीवनावश्यक वस्तू वाटप

जयंती उत्सवाच्या खर्चातून जीवनावश्यक वस्तू वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी यावर्षी समाजातील गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बाबासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला सुमारे ११० कुटुुंबांना जीवनावश्यक वस्तू वितरित करण्यात आले.
तळोदा येथील नोकरदार असणाऱ्या आंबेडकरी अनुयायांकडून दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर साजरा केली जाते. जयंतीनिमित्ताने व्याख्यान, परिसंवाद, भीमगीत गायन, कीर्तन, जलसा यासारख्या प्रबोधनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही अशा स्वरूपातील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांचे नियोजन प्राथमिक पातळीवर सुरू होते. मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सार्वजनिक स्वरूपात साजरी करता येणे शक्य नसल्याने यावर्षीच्या जयंती उत्सवाच्या खर्चातून समाजोपयोगी उपक्रम राबवून कृतीशील अभिवादन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाºया नागरिकांचा रोजगार बुडाल्याने त्यांचे कुटुंब मोठ्या आर्थिक विवनचनेला सामोरे जात आहे. त्यामुळे यावर्षीच्या जयंतीच्या खर्चातून तळोदा येथील आंबेडकरी अनुयायांनी अशा गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला तळोद्यातील ११० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम आयोजित न करता घरपोच वाटप करण्यात आले.
तळोदा येथील फुले शाहू आंबेडकर विचारमंच व अंनिसचे कार्यकर्ते अ‍ॅड.राजेंद्र इंदिस, डॉकिशोर सामुद्रे, मुकेश कापुरे, संतोष केदार, हंसराज महाले, सुनील पिंपळे, अमोल पाटोळे, रवी आगळे, प्रणित धारगावे, महेंद्र सामुद्रे, प्रा.राजू यशोद, राहूल जावरे, सुनील खैरनार, विनोद बोरसे, अनिल पवार, पप्पू साळवे, सोनू नरभवर यांनी पुढाकार घेऊन जीवनावश्यक वस्तूंची पाकिटे तयार करून गरजू कुटुंबाना वितरीत केले. या उपक्रमासाठी तळोदा येथील सर्व आंबडेकरी अनुयायांसह सार्वजनिक जयंती उत्सव समिती, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ब्लू टायगर बाईज, लहूजी वस्ताद ग्रुप, राष्ट्रीय छात्र सेना, चर्मकार नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

Web Title:  Distribution of essential items at the expense of Jubilee celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.