परिवर्धे विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:35 IST2021-03-01T04:35:45+5:302021-03-01T04:35:45+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद श्रीपत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मणिलाल शिंपी, ठाणे येथील दिनेश ठक्कर, नितीन चंदेईया, तरुण नागडा, ...

परिवर्धे विद्यालयात शैक्षणिक साहित्याचे वाटप
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंद श्रीपत पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून मणिलाल शिंपी, ठाणे येथील दिनेश ठक्कर, नितीन चंदेईया, तरुण नागडा, मोहन शेवाळे, एकनाथ पाटील, उद्धव पाटील, वसंत बोकनळ, केशव मालुनकर, जितेंद्र सोनवणे, विजय भामरे, कैलास पाटील, छोटू अहिरे, वसंत गावीत, दिलीप पावरा, मुख्याध्यापक जे.एस. पाटील उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ठाणे येथील आर.एस.पी. महासमादेशक अरविंद देशमुख, मणिलाल शिंपी, जीवनदीप प्रकाशनचे गोरखनाथ पोळ यांनी सहकार्य यांच्या आर्थिक सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मणिलाल शिंपी यांनी ऑनलाइन पालकांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले. रामदास बोकनळ यांनीही रस्ता सुरक्षेविषयी माहिती दिली. कोरोना काळात नागरिकांना सहकार्य केल्याबद्दल शाळेतील शिक्षक एम.एस. पाटील, व्ही.व्ही. पाटील, सी.आर. पाटील, एस.बी. पाटील, आर.व्ही. ईशी यांचा सत्कार करून शाळेचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. सूत्रसंचालन के.एन. पाटील यांनी केले.