शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 12:28 IST2020-03-01T12:27:51+5:302020-03-01T12:28:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पळाशी ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात भारतीय कापूस महामंडळ व भारतीय ...

Distribution of cotton grinding machines to farmers | शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राचे वाटप

शेतकऱ्यांना कापूस वेचणी यंत्राचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पळाशी ता़ नंदुरबार येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रात भारतीय कापूस महामंडळ व भारतीय रेल्वे अर्थसहाय्य महामंडळाच्या आर्थिक सहाय्याने शेतकऱ्यांना कापूस काढणी यंत्राचे वाटप करण्यात आले़ ४७० शेतकºयांना हे यंत्र मंजूर करण्यात आले आहे़
यावेळी उपजिल्हाधिकारी संदीप कदम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे समितीचे सभापती किशोर पाटील, शेतकरी सहकारी संघाचे सभापती बी़ के़पाटील, भारतीय कापूस महामंडळाचे प्रबंधक उमंग गुडहा, के़एऩओझा, आदित्य वामन, रोहिदास राठोड, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, भरत पाटील, दिलीप पाटील, जितेंद्र पाटील, अंकुश पाटील,अशोक चौधरी उपस्थित होते़
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना, संदीप कदम यांनी १०० टक्के अनुदानाने हे कापूस वेचणी यंत्र शेतकºयांना दिले जात असून गुणवत्ता कमिटीतर्फे शेतकºयांची निवड करण्यात आली असल्याची माहिती दिली़
कार्यक्रमात शेतकºयांना मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले़ मंगलाबाई दातीर, ईश्वर ठाकरे, तुकाराम पाटील, अशोक पाटील, गोपाल सिंग गिरासे यांना प्रतिनिधिक स्वरुपात मशिनचे वाटप करण्यात आले़ सूत्रसंचालन आशिष दातीर तर आभार पंकज झोडे यांनी मानले. उर्वरित लाभार्थी शेतकºयांना येत्या काही दिवसात खरेदी केंद्रातच या यंत्राचे वाटप होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़

Web Title: Distribution of cotton grinding machines to farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.