आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी संगणक व लॅपटॉप वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:30 IST2021-03-06T04:30:11+5:302021-03-06T04:30:11+5:30
विशेष केंद्र सहाय्य योजनेंतर्गत तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांसाठी ही योजना राबविली ...

आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी संगणक व लॅपटॉप वाटप
विशेष केंद्र सहाय्य योजनेंतर्गत तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांसाठी ही योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत वसतिगृहात ग्रंथालय, प्रयोगशाळा स्थापन करण्यात आले आहे. या प्रयोगशाळासाठी तसेच आश्रमशाळा व वसतिगृहासाठी संगणक उपलब्ध करण्यासाठी तरतूद प्राप्त झालेली होती. त्यानुसार तळोदा प्रकल्पातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील शासकीय आश्रमशाळांना एकूण ८१ लॅपटॉप व ७८ डेस्कटॉप कॉम्प्युटर्स प्रकल्प अधिकारी अविशांत पांडा यांच्या हस्ते वाटप करण्यात आलेत.
याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, एन.डी. जानकर, संजय चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी बी.एम. कदम, एन.डी. ढोले आदी उपस्थित होते. आश्रमशाळेतील व वसतिगृहातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्याना संगणकीय कामकाज करताना त्यांच्या संगणकीय कामकाजात सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे व ज्ञानातही भर होण्यास मदत मिळणार असल्याचे प्रकल्प कार्यालयाकडून सांगण्यात आले.