व्यावसायिकाकडून ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:23 IST2019-09-08T12:23:14+5:302019-09-08T12:23:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील एका युवा दुकानदाराने खरेदीसाठी येणा:या ग्राहकांना कापडी पिशवी भेट देऊन ...

व्यावसायिकाकडून ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथील एका युवा दुकानदाराने खरेदीसाठी येणा:या ग्राहकांना कापडी पिशवी भेट देऊन दुकानात येताना ही कापडी पिशवी सोबत आणण्याचा आग्रह करीत प्लॉस्टीक पिशव्यांना हद्दपार करण्याचा उपक्रम राबवला.
रांझणी, ता.तळोदा येथील किराणा व्यावसायिक जयेश पवार यांनी त्यांच्या दुकानात विविध खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना कापडी पिशवी भेट दिली. आपल्या दुकानावर खरेदीसाठी येताना ही कापडी पिशवी सोबत आणण्याचा आग्रह करीत प्लॉस्टीक पिशव्या न वापरण्याचे आवाहन ते करतात. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून परिसरातील ग्रामस्थांनीही प्लॉस्टीक कॅरी बॅग हद्दपार करण्याचा संकल्प केला आहे. याबाबत जयेश पवार यांनी सांगितले की, माङया या उपक्रमामुळे प्लॉस्टीक बंदीस हातभार लागण्यास मदत होऊन स्वच्छ भारत अभियानात मदत केल्याचे समाधान मिळेल, असे सांगितले.