महसूल दिनानिमित्त शहाद्यात प्रमाणपत्रांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:11 IST2021-08-02T04:11:42+5:302021-08-02T04:11:42+5:30
अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे होते. यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, संध्या देवळे, एस. जी. ...

महसूल दिनानिमित्त शहाद्यात प्रमाणपत्रांचे वाटप
अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे होते. यावेळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नायब तहसीलदार विजय गोस्वामी, संध्या देवळे, एस. जी. पाटील, पी. सी. धनगर आदी उपस्थित होते. प्रारंभी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रांताधिकारी डॉ. गिरासे म्हणाले की, महसूल विभागातील सर्वच कर्मचारी हे तनमन लावून काम करतात. कोरोनाचा प्रादुर्भाव व कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे शेकडो कुटुंबं उद्ध्वस्त झाली. या परिस्थितीत कार्यक्रमाबाबत साशंकता होती. मात्र विभागीय आयुक्तांनी निर्णय घेऊन हा कार्यक्रम घेण्याचे ठरवले. त्यानुसार अल्पावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महसूल विभाग हा लोकाभिमुख कार्य करणारा विभाग आहे. महसूल विभागात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकांच्या विविध समस्या जाणून त्यांना समर्पक उत्तर देणे गरजेचे असल्याचे सांगून त्यांनी महसूल विभागाच्या कार्याची माहिती त्यांनी दिली. प्रास्ताविकात तहसीलदार डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, शासनाच्या कुठल्याही योजना व उपक्रमात महसूल विभागाचे योगदान मोठे असते. गेल्या वर्षभरात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात वनपट्टे प्रमाणपत्र, कोरोनाकाळात मृत्यू झालेल्या नागरिकांच्या निराधार कुटुंबातील लाभार्थींना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यात ताराबाई आवेश (गोगापूर), ज्योतीबाई कोळी व लताबाई कोळी (डामरखेडा) शीला पवार व संगीता पवार (दामळदा), उषा पाटील व कलूबाई ठाकरे (मोहिदेतर्फे शहादा) सुशीला साबळे (शहादा) मालती शिखर व मंजुळाबाई मुसळदे (खेडदिगर) पारूबाई पवार (वीरपूर) आदींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास मंडल अधिकारी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष शिरीष परदेशी, मंडल अधिकारी पी.बी. अमृतकर, बी. ओ. पाटील, व्ही. डी. साळवे, मुकेश चव्हाण, जुबेर पठाण, निकिता नायक, भानुप्रिया सूर्यवंशी, निशिगंधा साळवे, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रीतम नागदेवते यांनी केले. आभार लक्ष्मण कोळी यांनी मानले.