कृषी विभागामार्फत अंबापूर येथे बाजरी बियाणे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:25+5:302021-06-28T04:21:25+5:30
यासाठी प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.ए. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे ग्रामपंचायत कार्यालय येथे वाटप करण्यात आले. या ...

कृषी विभागामार्फत अंबापूर येथे बाजरी बियाणे वाटप
यासाठी प्रभारी तालुका कृषी अधिकारी एस.ए. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे ग्रामपंचायत कार्यालय येथे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास कृषी सहायक प्रवीणा सूर्यवंशी यांनी गावातील शेतकऱ्यांची निवड करून त्यांना बाजरी पिकाचे बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, पेरणीचे अंतर, तण व्यवस्थापन, गोसावी रोग प्रतिबंधक उपाय याविषयी माहिती दिली. कृषी पर्यवेक्षक एस.एन. पाटोळे यांनी मूलस्थानी जलसंधारण, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यांची माहिती दिली. तसेच मंडळ अधिकारी सुनील गांगर्डे यांनी १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. तसेच महाडीबीटी या ऑनलाइन प्रक्रियेत ज्या शेतकऱ्यांचे सूक्ष्म सिंचन अभियानाअंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे अपलोड करण्याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमास गावातील प्रगतिशील शेतकरी भरत बागूल, कृषी पर्यवेक्षक राजू हिरे, कृषी सहायक मणिलाल साबळे, मंजित्रा कोकणी व गावातील शेतकरी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते. आभार कृषी सहायक मणिलाल साबळे यांनी मानले.