शिंपी समाजातर्फे १५ शिवण मशीनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST2021-08-24T04:34:22+5:302021-08-24T04:34:22+5:30

अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागूल तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वस्त शांताराम सावळे, सुनील निकुंभ, स्वामी नारायण ...

Distribution of 15 sewing machines by the tailor community | शिंपी समाजातर्फे १५ शिवण मशीनचे वाटप

शिंपी समाजातर्फे १५ शिवण मशीनचे वाटप

अध्यक्षस्थानी शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागूल तर प्रमुख अतिथी म्हणून विश्वस्त शांताराम सावळे, सुनील निकुंभ, स्वामी नारायण ट्रस्ट कल्याणचे डॉ. दिनेश ठक्कर, आर.एस.पी. कमांडर डॉ. मणिलाल शिंपी, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, मुख्य सचिव संजय खैरनार, सहसचिव आर. टी. सोनवणे, वनेश खैरनार, रोहित तरटे, युवक आघाडी अध्यक्ष प्रमोद शिंपी, सहखजिनदार जयंत कन्नडकर, पत्रकार किशोर पाटील, आर.एस.पी. अधिकारी बन्सीलाल महाजन, घनश्याम सोनवणे, जोशीला पगारिया, आरती दुसेजा, जळगांव जिल्हा संघटक दिलीप कापडणे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष सुभाष सावळे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंपी, कोषाध्यक्ष बळवंत निकुंभ, जिल्हा संघटक गजेंद्र शिंपी, विजय चव्हाण, राजेंद्र जगताप, अजय चव्हाण, दत्तात्रय अहिरे, मुकेश शिंपी, हिरालाल शिंपी, प्रसाद कापुरे, नाटेश्वर चव्हाण, महिला अध्यक्षा रंजनाबाई शिंपी, सरिता भामरे, सिंधुबाई निकुंभ, जिल्हा युवती अध्यक्षा पूजा शिंपी व समाज बंधू-भगिनींची उपस्थिती होती.

प्रारंभी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वामी नारायण ट्रस्ट कल्याण यांच्यामार्फत ४० मशीन मध्यवर्ती संस्थेला मिळवून देणारे डॉ. मणिलाल शिंपी यांचा सपत्नीक समाजातर्फे सत्कार करण्यात आला. निवृत्त मुख्याध्यापक मोहन पटेल व छोटू पाटील यांचाही स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिवण मशीन उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. दिनेश ठक्कर यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्य सचिव संजय खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप शिंपी यांनी केले तर आभार सोमनाथ शिंपी यांनी मानले. कार्यक्रमासाठी योगेश जाधव, मोहन भामरे, विजय देवरे, दिनेश पवार, योगेश खैरनार, संजय सैंदाणे, विवेकानंद चव्हाण, अजय देवरे, प्रसन्न शिंपी, शुभम शिंपी, राहुल सोनवणे, प्रकाश अहिरे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Distribution of 15 sewing machines by the tailor community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.