कोंढावळ विविध साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:44 IST2020-02-25T13:44:23+5:302020-02-25T13:44:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोंढावळ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी रोटरी क्लब नंदनगरीतर्फे कोंढावळ ता.शहादा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात बेंच, ...

Distribute various materials to the curly | कोंढावळ विविध साहित्य वाटप

कोंढावळ विविध साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढावळ : शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी रोटरी क्लब नंदनगरीतर्फे कोंढावळ ता.शहादा येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात बेंच, क्रीडा व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितीश बांगड, रोटरी ३०६० चे असिस्टंट गव्हर्नर निलेश तंवर, फकरोद्दीन जलगूवाला, सैय्यद इसरार अली, अनिल शर्मा, युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन, सामाजिक कार्यकर्ते निखिल माळी यांच्यासह नुतन शहादा रोट्रॅक्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रवीण महाजन यांनी रोटरी क्लबच्या विविध उपक्रमांची माहिती विषद केली. दरम्यान प्रितीश बांगड यांनी गरीब, वंचीत समाजाच्या उत्थानासाठी काम करणे हीच खरी समाजसेवा असून रोटरी क्लब आॅफ नंदनगरीच्या माध्यमातून ही सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक जे.पी.माळी यांनी प्रास्ताविक केले. तर योगेश शिंपी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक गोरखनाथ वाल्हे, धनराज जगताप, कैलास सैंदाणे, रोहिदास खैरनार, मंदाकिनी माळी, रवींद्र अहिरे, स्वप्नील बैसाणे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मनोज रोकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Web Title: Distribute various materials to the curly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.