एक व पाच रुपयांची नोटबाबत ग्राहक व विक्रेत्यांमध्ये वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:31 IST2021-03-05T04:31:26+5:302021-03-05T04:31:26+5:30
सविस्तर वृत्त असे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक व पाच रुपयांच्या कागदी नोटा चलनात आणल्या असून एक रुपयाची नवीन ...

एक व पाच रुपयांची नोटबाबत ग्राहक व विक्रेत्यांमध्ये वाद
सविस्तर वृत्त असे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने एक व पाच रुपयांच्या कागदी नोटा चलनात आणल्या असून एक रुपयाची नवीन नोट आकर्षक रंगात आहे. या कागदी नोटा बाजारात चलनासाठी उपलब्ध आहेत. मात्र या नोटा ग्राहकांकडून दुकानदार घेत नाहीत किंवा कधी कधी ग्राहक या नोटा घेण्यास नकार देतात. बाजारात भाजीपाला, किराणा दुकान, पानटपरी आदी ठिकाणी सुट्या पैशांची देवाण-घेवाण करावी लागते. त्यावेळी ग्राहक व विक्रेत्यांमध्ये या नोटांच्या देवाण-घेवाणवरून वाद होतात. मोठे व्यापारी या नोटा आमच्याकडून घेत नसल्याचे किरकोळ विक्रेत्यांचे म्हणणे आहे. बसमधून प्रवास करताना एक रुपयाची नोट दिली तर काही वाहकही प्रवाशांकडून ती स्वीकारण्यास नकार देतात. त्यावेळी प्रवासी अडचणीत येतो. पाच रुपयाच्या कागदी नोटबाबतही अशाच तक्रारी ग्राहकांकडून होत आहे. या नोटा न स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने एक व पाच रुपयाची कागदी नोट चलनात आणलेली आहे. या नोटा बंद करण्यात आलेल्या नाहीत. बँकेत भरण्यासाठी जर ग्राहक आले तर आम्ही ती स्वीकारतो.
-प्रकाश महाले, रोखपाल, भारतीय स्टेट बँक, शाखा प्रकाशा