किरकोळ कारणाच्या वादातून महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 12:27 IST2019-09-18T12:27:41+5:302019-09-18T12:27:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : घरगुती कारणाच्या  वादातून महिलेचा विनयभंग करीत तिला लोखंडी रॉडने मारहाण  केल्याची घटना नंदुरबार येथे ...

Disobedience of woman through petty argument | किरकोळ कारणाच्या वादातून महिलेचा विनयभंग

किरकोळ कारणाच्या वादातून महिलेचा विनयभंग

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरगुती कारणाच्या  वादातून महिलेचा विनयभंग करीत तिला लोखंडी रॉडने मारहाण  केल्याची घटना नंदुरबार येथे 15 रोजी घडली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिहान आरिफ शेख व फरहान आरिफ शेख, रा.रज्जाकपार्क, नंदुरबार असे संशयीतांची नावे आहे. त्याच परिसरात राहणारी 19 वर्षीय महिला व रिहान यांचे घरगुती कारणावरून भांडण होते. त्यातून रिहान व फरहान यांनी महिलेला अलीसाहब मोहल्ला भागात गाठत बुरखा फाडला व लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. तसेच विनयभंग करीत शिविगाळ केली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. याबाबत पिढीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार चौधरी करीत आहे.     
 

Web Title: Disobedience of woman through petty argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.