सांडपाणी काढण्याच्या वादातून सुलवाडे येथे महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:52 IST2019-09-26T11:52:49+5:302019-09-26T11:52:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गटारीचे सांडपाणी मोकळ्या जागेत काढल्याच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची सुलवाडे ता़ शहादा येथे घडली़ ...

सांडपाणी काढण्याच्या वादातून सुलवाडे येथे महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गटारीचे सांडपाणी मोकळ्या जागेत काढल्याच्या वादातून महिलेचा विनयभंग केल्याची सुलवाडे ता़ शहादा येथे घडली़ मंगळवारी घडलेल्या घटनेप्रकरणी गुन्हा करण्यात आला आह़े
सुलवाडे येथील महिलेने घरासमोरील गटारीचे तुंबलेले पाणी मोकळ्या जागेत काढून पाण्याचे वहन करुन दिले होत़े याचा राग येऊन उषाबाई परशराम पवार हिने महिलेसोबत वाद घालत मारहाण केली़ दरम्यान सुनिल परशराम पवार, राजू परशराम पवार यांनी महिलेची ओढाताण करुन विनयभंग केला़ पिडित महिलेच्या पतीस मारहाण करण्यात आली़ पिडित महिलेने म्हसावद पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांविरोधात गुन्हा दाखल आह़े