डॉक्टरकडून लॅबमधील महिलेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:10 IST2020-02-02T12:10:44+5:302020-02-02T12:10:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लॅबमध्ये कामाला असलेल्या युवतीचा एकटी असल्याचे पाहून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात ...

डॉक्टरकडून लॅबमधील महिलेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लॅबमध्ये कामाला असलेल्या युवतीचा एकटी असल्याचे पाहून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारातील कोकणीहिल भागातील लॅबमध्ये २६ जानेवारी रोजी ही घटना घडली.
डॉ.रितेशकुमार सुरेश जैन, रा.कन्यादान मंगल कार्यालयाजवळ, नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे. नंदुरबारातील दुधाळे शिवारात हिंद लॅब आहे. त्या ठिकाणी २६ जानेवारी रोजी डॉ.जैन याने तेथे काम करणाऱ्या युवतीला बोलावून घेतले. लॅबमध्ये एकटी असल्याचे पाहून त्याने तिच्याशी वाईट कृत्य करण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. या प्रकाराची बाहेर वाच्यता करू नये म्हणून धकमी देखील दिली. परंतु चार दिवसानंतर युवतीला हिंमत आल्याने तीने शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून डॉ.रितेशकुमार जैन यांच्याविरुद्ध विनयभंग व अॅट्रासिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार करीत आहे.