आजाराला कंटाळून कवटाळले मृत्यूला
By Admin | Updated: April 17, 2017 16:51 IST2017-04-17T16:51:47+5:302017-04-17T16:51:47+5:30
लक्षा वसावे याला डोकेदुखीचा आजार जडल्याने तो त्रस्त होता़

आजाराला कंटाळून कवटाळले मृत्यूला
नंदुरबार, दि. 17- अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील लक्षा गोविंदा वसावे (20) या तरुणाने आजाराला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. लक्षा वसावे याला डोकेदुखीचा आजार जडल्याने तो त्रस्त होता़ यातून कंटाळत त्याने मोलगी सोराचापाडा शिवारातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली़