Discussions on reforms in the education sector | शिक्षण विभागातील सुधारणांवर चर्चा

शिक्षण विभागातील सुधारणांवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा शिक्षण विभागाचे कामकाज, प्रगती आणि करावयाच्या सुधारणा यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली़ खासदार डॉ़ हीना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते़
खासदार डॉ़ हीना गावीत यांच्यासह आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी एऩव्ही़ कदम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी बी़आऱरोकडे, डाएटचे प्राचार्य जालिंदर सावंत, शिक्षणाधिकारी डॉ़ किरण कुवर, शिक्षणाधिकारी डॉ़ युनूस पठाण यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी तसेच डाएटचे अधिव्याख्याता उपस्थित होते़ बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यातील दुर्गम भागातील शाळांची परिस्थिती तसेच या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाषिक समस्या, नर्मदा काठच्या गावांमधील शाळांमध्ये शिक्षक न जाणे, शिक्षकांनी त्यांच्या जागी परस्पर गावातील इतर दहावी व बारावीतील शिक्षित विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य देणे, कामचुकार शिक्षक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली़
बैठकीत लॉकडाऊन संपल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयांच्या क्षमतांची चाचणी घे१न ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक असणार नाही अशा शाळांबाबत चर्चा झाली़ या शाळांच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांची सभा घेऊन शिक्षकाला नियमानुसार कामकाज करण्याच्या सूचना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़
शाळेत वृक्षारोपण, शाळेत विद्युत सुविधा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह या संदर्भातील माहिती असूक भरण्यावर भर देण्याचे आदेश देण्यात आले़ प्रसंगी जिल्हास्तरीय समस्या व शासन स्तरावरील समस्या यावरही चर्चा झाली़ आगामी दिशा समितीच्या बैठकीत जिल्हास्तरीय समितीचा निपटारा करुन सर्व शाळा आॅप्टिकल फायबर केबलने जोडून नेटची व्यवस्था करुन शाळा डिजीटल करणार असल्याचे खासदार डॉ़ हीना गावीत यांपी बैठकीत सांगितले़

सुमारे अडीच तास सुरु असलेल्या या बैठकीत विद्यार्थ्यांचे आधारकार्ड, बँक अकाउंट, शाळा बाह्य विद्यार्थी सर्वेक्षण, स्थलांतरीत विद्यार्थ्यांना शिक्षण हमी कार्ड देणे, परत आलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करुन घेणे आदी विषयांचा आढावा घेण्यात आला़ आकांक्षित जिल्ह्यासाठीच्या योजनांची अंमलबजावणी, प्रलंबित बांधकाम पूर्ण करणे आणि तोरणमाळ आंतरराष्ट्रीय शाळा बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले़

Web Title:  Discussions on reforms in the education sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.