भाजप महिला मोर्चा जिल्हा बैठकीत विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST2021-02-05T08:09:44+5:302021-02-05T08:09:44+5:30
भाजपतर्फे महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पदनियुक्तीसाठी शहादा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

भाजप महिला मोर्चा जिल्हा बैठकीत विविध विषयांवर चर्चा
भाजपतर्फे महिला मोर्चाच्या विविध पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पदनियुक्तीसाठी शहादा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विजय चौधरी यांनी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी महिला पदाधिकारी यांनी काम करावे. तळागाळातील महिलांच्या अडचणी, समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घ्यावा असे आवाहन केेले. याप्रसंगी महिला मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र प्रभारी जयश्री अहिरराव, जि.प. सभापती जयश्री पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार, जितेंद्र जमदाडे, माधवी पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सपना अग्रवाल, शहराध्यक्ष विनोद जैन, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अनामिका पटेल, सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष नितेश राजपूत, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस देसाई, महिला मोर्चा शहराध्यक्ष रोहिणी भावसार आदी उपस्थित होत्या.