पोलीस अधिक्षकांसमोर झाली वाहतूकीवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:38 IST2019-07-22T12:38:31+5:302019-07-22T12:38:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर मार्ग काढण्यात यावा अशी अपेक्षा पोलीस ...

Discussed traffic congested before the police superintendents | पोलीस अधिक्षकांसमोर झाली वाहतूकीवर चर्चा

पोलीस अधिक्षकांसमोर झाली वाहतूकीवर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत असून त्यावर मार्ग काढण्यात यावा अशी अपेक्षा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आली़ शनिवारी पोलीस अधिक्षकांच्या दालनात ही बैठक घेण्यात आली़ 
बैठकीस अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी, नितीन जगताप, वैैभव करवंदकर, विजय राठोड, राहुल पोतदार, संतोष मराठे, योगेश अहिरे, शैलेश सोनवणे उपस्थित होत़े 
बैठकीत शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर कशा प्रकारे वाहतूक सुरळीत करता येईल यासाठी तयार केलेली पुस्तिका पोलीस अधिक्षक पंडीत यांना देण्यात आली़ अप्पर पोलीस अधिक्षक पंडीत यांना सोबत घेऊन शहरातील वाहतूकीची समस्या सोडवून महाविद्यालयांच्या परिसरात फिरणा:या टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यात असे सांगितल़े यावेळी तिन चाकी प्रवासी रिक्षा, हातागाडय़ा यांचे नियोजन करण्यावर चर्चा झाली़ 
 

Web Title: Discussed traffic congested before the police superintendents