दुष्काळी स्थितीमुळे चेतक फेस्टीवलचा निधी रोखण्यासाठी सरकारसोबत चर्चा करु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:25 IST2018-11-12T13:25:16+5:302018-11-12T13:25:43+5:30
पत्रपरिषद : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची माहिती

दुष्काळी स्थितीमुळे चेतक फेस्टीवलचा निधी रोखण्यासाठी सरकारसोबत चर्चा करु
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात तीन तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे चेतक फेस्टीवलसारखे उत्सव हे लोकसहभागातून झाले पाहिजेत़ त्यासाठी शासन खर्च करत असेल तो निधी रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करु अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली़
भाजपाच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यासाठी रविवारी प्रदेशाध्यक्ष दानवे हे नंदुरबारात आले होत़े यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली़ प्रसंगी बोलता ते म्हणाले की, लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी राज्यभर दौरे सुरु आहेत़ दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात आह़े लोकसभा निवडणूकांसाठी कार्यकर्ते सक्रीय व्हावेत असा या दौ:याचा उद्देश आह़े नंदुरबार जिल्हा भाजपात गटबाजी असल्याचे सांगण्यात येत असले तरी पक्षात कोणत्याही प्रकारची गटबाजी नाही आणि असेल तर पक्षीय स्तरावर ती पाहून घेऊ असे सांगून दाने यांनी गटबाजीच्या मुद्दय़ाला बगल दिली़
सारंगखेडा येथे होणा:या चेतक फेस्टीवलसाठी पर्यटन विभागाकडून दिल्या जाणा:या निधीबाबत प्रश्न उपस्थित झाला असता, ते म्हणाले की, तीन तालुके दुष्काळी आहेत़ या पाश्र्वभूमीवर होणारे उत्सव हे पारंपरिक असल्याने ते लोकसहभागातून घेतले गेले पाहिजेत़ त्यावर शासन काय खर्च करते आहे, हे पाहून खर्च कमी करणे किंवा तो रोखण्यासाठी शिफारस करणार असल्याचेही त्यांनी सांगितल़े
भाजपाच्या राममंदीर मुद्दय़ाचे समर्थन करताना हा मुद्दा स्वागतार्ह असल्याचे सांगून शिवसेना आणि भाजप हे समविचारी पक्ष असल्याने त्यांची युती ही मतांचे विभाजन टाळण्यासाठी गरजेची आह़े युती व्हावी असाच भाजपाचा प्रयत्न राहणार आह़े नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळ निवारण आणि सिंचन प्रकल्प वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी येथे लक्ष घालावे असेही सुचवणार असल्याचे ते शेवटी म्हणाल़े
पत्रकार परिषदेस पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपाच्या जिल्हाध्यक्षा तथा खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, आमदार उदेसिंग पाडवी, संघटनमंत्री विजय पुराणिक, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होत़े