शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
3
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
4
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
5
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
6
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
7
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
8
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
9
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
10
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
11
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
12
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
13
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
14
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?
15
भारतात लाँच होणार लठ्ठपणावरचं नवं औषध, कंपनीचा शेअर बनला रॉकेट; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
16
दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय
17
भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा
18
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं
19
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
20
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल

नऊ जणांची कोरोनावर ‘मात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील सात, शिंदखेडा तालुक्यातील एक आणि जिल्हा रुग्णालयातील दोघे असे ९ जण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील रजाळे येथील सात, शिंदखेडा तालुक्यातील एक आणि जिल्हा रुग्णालयातील दोघे असे ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ त्यांना सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊन घरी रवाना करण्यात आले़ दरम्यान रविवारी रात्री दोघा पॉझिटिव्ह पुरुषांच्या संपर्कातील सहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़रविवारी रात्रीच्या अहवालात दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली होती़ दोघांना रात्री उशिरा आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले होते़ हिंगणी येथील २९ वर्षीय युवक आणि नंदुरबार शहरातील ४१ वर्षीय पुरुष यांना एकीकडे जिल्हा रुग्णालयात आणत असताना दुसरीकडे तब्बल ९ जण कोरोनामुक्त झाल्याची सुखद माहितीही प्रशासनाला मिळाली होती़ यात रजाळे येथील ६६ वर्षीय पुरुष, ६ वर्षीय बालिका, ५५ आणि २८ वर्षीय महिला तसेच ३१ आणि ३५ वर्षीय युवकांचा समावेश होता़ दरम्यान जिल्हा रुग्णालयातील दोघे कर्मचारी व शिंदखेडा येथील ३५ वर्षीय पुरुष कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने त्यांना सोमवारी सोडून देण्याचा निर्णय घेतला होता़ यानुसार दुपारी १२ वाजता त्यांना रुग्णवाहिकेने घराकडे रवाना करण्यात आले़ यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. भोये, डॉ. के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा रुग्णालयात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८ असुन सध्या ४ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. अन्य ३ कोरोना बाधितांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.कोरोना हा उपचाराअंती या रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे याप्रसंगी करण्यात आले़रजाळे येथे गेलेल्या कुटूंबाचे ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून स्वागत केले होते़ ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते़तळोदा तालुक्यातील सोमावल येथील मयत गर्भवती महिलेच्या संपर्कातील सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ महिलेचा २५ मे रोजी नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता़ तिच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते़ दरम्यान त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ या रिपोर्टमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे़

सहा वर्षीय बालिका कोरोनामुक्त

कोरोनामुक्त झालेल्या सहा वर्षीय बालिकेचाही समावेश आहे़ ही बालिका जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कमी वयातील कोरोनामुक्त ठरली असून तिचे रुग्णालय प्रशासनाकडून कौतूक करण्यात आले़ तिचा जिल्हा रुग्णालयाच्या स्टाफकडून विशेष गौरव करुन तिला घरी पाठवण्यात आले़

नागाई नगरातील मुंबई रिटर्न कोरोनाबाधिताच्या संपर्कात सात जण आल्याची माहिती समोर आली आहे़ यात दोघे तळोदा येथील असल्याने त्यांना तेथेच क्वारंटाईन करण्यात आले़ तर घरातील आई-वडील, पत्नी अणि मुलगी यांना नंदुरबारात क्वारंटाईन करण्यात आले़ सोमवारी सकाळी नवापुर तालुक्यातील घोगळपाडा येथे राहणारा कोरोनाबाधिताचा भाऊही क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल झाला आहे़मिळालेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यात मुंबईवरुन आलेल्या संबधित रुग्णाने शहरातील चार दवाखान्यात हजेरी लावली होती़ या चारही दवाखान्यांना २४ तास सील करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे़ त्यांचे निर्जंतुकीकरण ते पुन्हा सुरु होणार आहेत़ सीबी पेट्रोपपंप परिसर, बायपास रोड येथील हे दवाखाने असल्याचे सांगण्यात आले आहे़जिल्हा प्रशासनाकडून नागाई नगरात जागोजागी बॅरीकेटींग करण्यात आले असून आरोग्य पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे़हिंगणी येथील २९ वर्षीय युवक आधीपासूनच क्वारंटाईन होता़ त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर हिंगणी गावात पुन्हा फवारणी करुन चौकशी सुरु करण्यात आली आहे़