शहरं
Join us  
Trending Stories
1
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
2
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
3
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
4
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
5
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
6
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
7
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
8
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
9
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
10
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
11
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
12
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
13
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार
14
खळबळजनक! T20 World Cup मध्ये मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, वेगवेगळ्या नंबरवरून आले फोन
15
ना आलिया भट, ना ऐश्वर्या अन् नाही कतरिना, ही आहे भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री
16
फडणवीसांशिवाय मंत्रिमंडळात भाजप असणे अशक्य; राष्ट्रवादीच्या मंत्र्याचे खळबळजनक वक्तव्य
17
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे लोकार्पण कधी? उद्धव ठाकरेंनी केली बांधकामाची पाहणी
18
सुख-शांती हिरावून घेऊ शकतं स्मार्टफोनचं व्यसन; 'या' आजारांचा धोका, काय आहे Nomophobia?
19
पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट! CM ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी; चर्चांना उधाण
20
"पप्पा फक्त एकदा परत या आणि..."; शहीद वडिलांना आजही व्हॉईस मेसेज पाठवतो ७ वर्षांचा लेक

महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 1:06 PM

शहादा उपविभागाची कारवाई : 800 कृषी पंपांचा वीजपुरवठा कापला

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : कृषी पंपाचे वीज बिल न भरल्याने महावितरणच्या शहादा उपविभागाकडून 800 कृषी पंप धारकांचे 36 विद्युत रोहित्रांवरील विज विजजोडणी खंडीत करण्यात आले आह़े अनेक वेळा सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून ही कारवाई करण्यात आली आह़ेशहादा उपविभागात शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव असे चार तालुके येतात़ त्यात एकूण 23 हजार 369 कृषी पंपधारक आहेत़ त्यांच्याकडे एकूण 280 कोटी 65 लाख इतकी प्रचंड थकबाकी आह़े शहादा क्ऱ1 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 946 तर, थकबाकी 112 कोटी 4 लाख, शहादा क्ऱ2 मध्ये एकूण ग्राहक 7 हजार 532 तर थकबाकी 112 कोटी 66 लाख, अक्कलकुव्यात ग्राहक 1 हजार 747 तर थकबाकी 7 कोटी 26 लाख तसेच धडगाव येथे ग्राहक 576 तर थकबाकी 2 कोटी 6 लाख, तळोद्यात 5 हजार 568 ग्राहक तर थकबाकी 46 कोटी 61 लाख अशी एकूण 280 कोटी 65 लाख रुपयांची थकबाकी आह़े एवढय़ा मोठय़ा रकमेचे वीज बिल थकीत असल्याने याची वसूली करणे आता महावितरणसमोर आव्हान असल्याचे मानले जात आह़े दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरण कंपनीकडून थकबाकीदार शेतक:यांकडून वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आह़े ज्या कृषी पंपाचे वीज कनेक्शन खंडीत करण्यात आले आह़े, त्यांचे वीज भरणा भरल्या शिवाय पुन्हा वीज कनेक्शन करण्यात येणार नसल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े तसेच संबंधितांनी तालुक्यातील विभागीय कार्यालयात जाऊन लवकरात लवकर  बिले भरावे असा आवाहन महावितरणकडून करण्यात येत आह़ेदरम्यान ज्यांनी अजूनही बिले भरली नसतील त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आह़े जमिनीची विक्री करुनही भरणा शक्य नाहीदरम्यान 280 कोटी रुपयांची थकबाकी म्हणजे साधी बाब नसल्याचे संबंधित शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े जमीन विकल्यावरदेखील थकबाकी भरता येणार नसल्याच्या हताश प्रतिक्रीया शेतक:यांकडून आता उमटताना दिसत आह़े त्यामुळे शासनाने ही थकबाकीची रक्कम माफ करावी अशी मागणी आता संबंधित शेतक:यांकडून करण्यात येत आह़े  परंतु महावितरणकडून याला नकार देण्यात आला आह़े ऐवढी मोठी रकमेची थकबाकी माफ करणे परवडणारे नसल्याचे महावितरणच्या अधिका:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे शेतक:यांना ही थकबाकी भरावीच लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े  दरम्यान, या आधीदेखील संबंधित शेतकरी व महावितरणचे अधिकारी यांच्यात थकबाकीबाबत संघर्ष दिसून आला आह़े थकबाकी माफ करण्यात यावी या मागणीसाठी अनेक वेळा शेतक:यांकडून मोर्चा आंदोलने करण्यात आली आहेत़ परंतु महावितरणचे अधिकारी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे वेळावेळी दिसून आले आह़े दरम्यान ही थकबाकी टप्प्या-टप्प्याने भरावी असाही पर्याय महावितरणकडून  खुला करुन देण्यात आला आह़े नापिकी  तसेच दुष्काळाशी दोन हात करणा:या शेतक:यांना ऐवढी रक्कम भरणे  शक्य नसल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, 800  कृषी पंपांची जोडणी खंडीत करण्यात आल्यामुळे आता शेतक:यांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत़ आधिच पाण्याची चणचण असताना शेतक:यांना आता कृषी पंपाचाही आधार नसल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न आता निर्माण होत आह़े