रनाळे तांबोळी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:34 IST2021-08-12T04:34:35+5:302021-08-12T04:34:35+5:30
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार याच्या विद्यमाने शालेय कृती आराखड्यानुसार हा उपक्रम घेण्यात आला. शालेय आपत्ती ...

रनाळे तांबोळी विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा
आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदुरबार याच्या विद्यमाने शालेय कृती आराखड्यानुसार हा उपक्रम घेण्यात आला. शालेय आपत्ती व्यवस्थापन समिती शिक्षक, विद्यार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक भारती चौधरी यांनी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविणे, पाण्यात बुडणाऱ्याला वाचविणे यासह इतर आपत्तींसंदर्भात माहिती देऊन बचावासंदर्भातील प्रात्यक्षिके केली. मुख्याध्यापक एम.सी. पवार यांनी सांगितले, ऐनवेळी आलेल्या आपत्तीला कसे तोंड द्यावे यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमीच सजग असले पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले पाहिजे. शास्त्रोक्त पद्धतीने याबाबत प्रशिक्षण घेतल्यास आयुष्यभरासाठी ते उपयोगी ठरते. नवनिर्माण संस्थेने दिलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले. प्रास्ताविक भाबड यांनी केले. आभार व्ही.एल. पावरा यांनी मानले. कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.