जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 12:24 IST2018-10-11T12:24:29+5:302018-10-11T12:24:35+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक
नंदुरबार : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्यावतीने येत्या 13 ऑक्टोबर रोजी होणा:या आपत्ती व्यवस्यापन दिनाच्या पाश्र्वभूमीवर प्रात्यक्षिके आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी धुळे येथील आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी विविध प्रात्यक्षिके करून दाखवली़
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आपत्ती व्यवस्थापन साहित्य प्रदर्शनाला अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, सरदार सरोवर प्रकल्प विभागाचे उपजिल्हाधिकारी दत्तात्रय बोरूडे, उपजिल्हाधिकारी सीमा पवार यांच्यासह अधिकारी व शहरातील नागरिकांनी भेटी देत माहिती जाणून घेतली़ प्रदर्शनादरम्यान आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी आपत्तीपासून नागरिकांचा बचाव करण्याबाबतची विविध प्रात्यक्षिके करून दाखवली़ दलाचे पोलीस उपनिरीक्षक डी़आऱभोसले, पोलीस उपनिरीक्षक पी़एस़सोनटक्के, पोलीस कॉन्स्टेबल ए़डी़छतलावे, पोलीस नाईक आय़जी़ मन्सूरी, आऱव्ही़साळूंके, एस़सी़पाटील, एस़एस़भंडलकर, टी़ज़ेखाटीक, ए़ए़खाटीक, एऩआऱमाळी, बी़ व्हि़माडोळे, सी़व्ही़गवळी, एस़वाय़पाटील, डी़डी़चव्हाण यांनी या प्रात्यक्षिकात सहभाग घेतला होता़ छतावरून नागरिकांचा जीव वाचवणे, आगीपासून बचाव यासह विविध प्रात्यक्षिक करत त्यांनी मार्गदर्शन केल़े