शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शासकीय कार्यालयांमध्ये निर्जंतूकीकरण मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या आदेशानुसार जिल्हाभर शासकीय व सार्वजनिक इमारतींचे निजंर्तुकीकरण करण्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषद इमारतीचेही निजंर्तुकीकरण करण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी नुकतेच जिल्हाभरातील शाळा, ग्रामपंचायत यासह सर्व शासकीय निमशासकीय व सार्वजनिक इमारती औषधांची फवारणी करून निजंर्तुकीकरण करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणीचे काम हाती घेण्यात आले. त्याबरोबरच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इमारतीतही सोडियम हायपोक्लोराईड या रासायनिक द्रव्याची फवारणी करण्यात आली. जिल्हा परिषद इमारतीच्या कानाकोपऱ्यात ही फवारणी करण्यात आली असून, जिल्हा परिषद पदाधिकारी निवास, जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत या भागातही निजंर्तुकीकरण प्रक्रिया करण्यात आली आहे.कोविड १९ म्हणजेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबरोबरच विविध उपाययोजना राबवून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भुपेंद्र बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महिला बालकल्याण डॉ. वर्षा फडोळ बेडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. एन. एल. बावा, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एच. चौधरी, जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रदिप लाटे, जिल्हा पशुधन विकास अधिकारी डॉ. यु. डी. पाटील, कार्यकारी अभियंता लघुसिंचन सुनील शिंदे, प्रमोद बडगुजर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी परिश्रम घेत आहेत.

शासकीय कर्मचारी निवासस्थानांच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर दक्षता घेतली जात आहे. जिल्हा परिषद आवारात पदाधिकारी आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे हा परिसर संपुर्णपणे निर्जंतुकीकरण केला जात आहे.