नुकसानग्रस्त शेतक:यांना अवकाळीची भरपाई बँक खात्यावर देण्याची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 12:25 PM2019-11-22T12:25:39+5:302019-11-22T12:25:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या ...

Disadvantaged Farmers: Process of payment of premature payment to bank account | नुकसानग्रस्त शेतक:यांना अवकाळीची भरपाई बँक खात्यावर देण्याची प्रक्रिया

नुकसानग्रस्त शेतक:यांना अवकाळीची भरपाई बँक खात्यावर देण्याची प्रक्रिया

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 10 हजार शेतक:यांच्या खरीप पिकांचे नुकसान झाले होत़े या पिकांसाठी शासनाने भरपाई जाहिर करुन नंदुरबार जिल्ह्यासाठी पहिल्या टप्प्यातील 1 कोटी रुपयांचा निधी दोन दिवसांपूर्वी पोहोचता केला होता़ या निधीचे वाटप बुधवारपासून सुरु झाले असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
कोरडवाहू शेतीपिकांसाठी शासनाने 8 हजार रुपये तर बागायती पिकांसाठी 18 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहिर केली आह़े ही मदत वर्ग करण्यासाठीची कारवाई जिल्हा प्रशासनाने बुधवारी सुरु केली होती़ यांतर्गत नंदुरबार तालुक्याला 4 लाख 50 हजार, नवापुर 27 लाख 21 हजार 500, शहादा 27 लाख 21 हजार 500, तळोदा 40 हजार, अक्कलकुवा 27 लाख 21 हजार 500 आणि धडगाव तालुक्यासाठी 27 लाख 21 हजार 500 रुपये असे एकूण 1 कोटी 13 लाख 76 हजार रुपयांचे वितरण करणे सुरु झाले आह़े 
जिल्ह्यात 10 हजार 885 शेतक:यांच्या 5 हजार 818 हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी आणि महसूल विभागाने केलेल्या  पंचनाम्यातून समोर आले होत़े यात 5 हजार 788 हेक्टर कोरडवाहू तर 22 हेक्टर क्षेत्र हे बागायती आह़े या संपूर्ण नुकसानीसाठी शासनाकडे 3 कोटी 8 लाख 23 हजार रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता़ त्यापैकी 1 कोटी 13 लाख रुपयांचे पहिल्या टप्प्यातील अनुदान जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले होत़े बुधवारी तालुकानिहाय तहसीलदारांना पत्र देऊन रकमेचे वाटप सुरु करण्यात आले आह़े तलाठींकडे कागदपत्रे देऊन बँकांची संपूर्ण माहिती देणा:या शेतक:यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आह़े दरम्यान गुरुवारी सकाळपासून तलाठींकडून कागदपत्रे पडताळणी करण्यासह बँक खात्यांची माहिती अपडेट करण्याचे काम सुरु करण्यात आल्याने शेतकरी त्यांच्याकडे धाव घेत होत़े जिल्ह्यात पहिल्यात टप्प्यात सर्वच शेतक:यांच्या खात्यावर मदत पोहोचती करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आह़े 
 

Web Title: Disadvantaged Farmers: Process of payment of premature payment to bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.