कार्यालय गाठतांना दिव्यांग बांधवांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:55 IST2019-05-09T18:55:37+5:302019-05-09T18:55:52+5:30
कोठार : तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय ...

कार्यालय गाठतांना दिव्यांग बांधवांची गैरसोय
कोठार : तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वृद्ध व दिव्यांग बांधवांना त्यामुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे पूर्वी खान्देशी गल्लीतील एका भाडे तत्त्वावरील घरात सुरू होते. मर्यादित जागेमुळे तेथेसुध्दा नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तळोद्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेगळ्या इमारतीत स्थलांतर करावे, अशी बºयाच वर्षापासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तळोदा येथे खान्देशी गल्लीत सुरू असणारे दुय्यम निबंधक कार्यालय तळोद्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. परंतु प्रशासकीय इमारतीत हे कार्यालयात स्थलांतरित झाल्यानंतरदेखील गैरसोय कायम आहे़
दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन, घर, प्लॉट या स्वरूपाची मालमत्ता खरेदी, विक्री, हस्तांतरण, तारण, वारस नोंद यांसारख्या विविध मालमत्ता विषयक व अन्य शासकीय, प्रशासकीय कामकाजासाठी दररोज अनेक नागरिक ये-जा करीत असतात. यात वृद्ध, अपंग व आजारी नागरिकांचादेखील मोठ्या संख्येने समावेश असतो. दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात येणारी मालमत्ता खरेदी, विक्रीची कामे ही आॅनलाइन झाल्याने ज्याच्या नावावर जमीन-घर किंवा अन्य मालमत्ता आहे त्या व्यक्तीला व ज्याला खरेदी करायची आहे त्याला समक्ष उपस्थित राहावे लागते. जमिन खरेदी, विक्रीच्या कामांसाठी येणाºया वृद्ध, अपंग, आजारी नागरिकांना जीना चढून वर जाणे त्रासदायक ठरते. बºयाच वृध्द व जेष्ठ नागरिकांना सांधे तसेख गुडघ्याचे विकार असल्याने त्यांची तर प्रचंड गैरसोय होत आहे़ बुधवारी व गुरुवारी अपंग व वृद्ध नागरिकांना जीना चढणे शक्य न झाल्यामुळे चक्क खुर्चीवर बसवून व ती खुर्ची उचलून त्यांना दुसºया मजल्यावरील दुय्यम निबंधक कार्यालय घेऊन जाण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला.