‘जामिया’मध्ये डिजीटल एक्स-रे मशीन कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:36 IST2020-06-10T12:36:00+5:302020-06-10T12:36:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : जामिया इशातुल उलुम संचलित अस्सलाम हॉस्पीटल गेल्या २५ वर्षांपासून अक्कलकुवा व परिसरात आरोग्य सेवा ...

‘जामिया’मध्ये डिजीटल एक्स-रे मशीन कार्यान्वित
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : जामिया इशातुल उलुम संचलित अस्सलाम हॉस्पीटल गेल्या २५ वर्षांपासून अक्कलकुवा व परिसरात आरोग्य सेवा देत आहे. सुसज्ज लॅबसह या हॉस्पीटलमध्ये आधुनिक उपकरणे व तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. या वेळी हॉस्पीटलला डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
आधुनिक गरजेनुसार संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी व मौलाना हुजैफा वस्तानवी यांच्या प्रयत्नाने डिजिटल एक्स-रे मशीन उपलब्ध करून देण्यात आले. या मशीचा शुभारंभ मंगळवारी जामियाचे अध्यक्ष मैलाना गुलाम वस्तानवी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी मौलाना गुलाम मुहम्मद वस्तानवी यांनी गरजू व आदिवासी रूग्णांना याचा लाभ होणार ंअसल्याचे सांगितले. मौलाना हुजैफा वस्तानवी व मौलाना उवेश वस्तानवी यांनी हॉस्पीटलला अत्याधुनिक करण्याचा संकल्प केला. या वेळी हॉस्पीटलचे डायरेक्टर कारी सुलेमान रंदेरा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.मसुद अहेमद, शेख अखलाक अहेमद यांनी जामिया प्रशासनाचे आभार मानले.