विजेअभावी धडगाव तालुका पाच दिवसांपासून अंधारात
By Admin | Updated: June 24, 2016 17:30 IST2016-06-24T17:30:59+5:302016-06-24T17:30:59+5:30
वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीत मोठा बिघाड झाल्याने सोमवारपासून धडगाव शहर आणि तालुका अंधारात आहे़
विजेअभावी धडगाव तालुका पाच दिवसांपासून अंधारात
ऑनलाइन लोकमत
धडगाव, दि. 24 - वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीत मोठा बिघाड झाल्याने सोमवारपासून धडगाव शहर आणि तालुका अंधारात आहे. बुधवारी दुपारी आलेली वीज पुन्हा गुल झाल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत तालुका काळोखात बुडाला होता. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून दुरूस्तीसाठी धावधाव होत असली तरी त्यांना अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे.
शहादा तालुक्यातील म्हसावद येथून वीजपुरवठा करणाऱ्या मेनलाईनवर सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मोठा बिघाड झाल्यानंतर धडगाव परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. हा वीजपुरवठा तीन दिवसांनंतर बुधवारी सायंकाळी पूर्ववत झाला़ त्यानंतर पुन्हा वीजपुरवठा बंद झाल्याने तालुका अंधारात आहे.
वीज कंपनीचे अधिकारी नव्याने कुठे, बिघाड झाला का, याचा शोध घेत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे.