धडगाव स्टेट बॅँकेला समस्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 12:22 IST2020-02-04T12:22:07+5:302020-02-04T12:22:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्टेट बँकेमार्फत सुरु केलेल्या धडगाव येथील बॅँक शाखेत केवळ धडगाव तालुक्यातलेच नव्हे तर अक्कलकुवा ...

Dhadgaon State Bank accepts problems | धडगाव स्टेट बॅँकेला समस्यांचे ग्रहण

धडगाव स्टेट बॅँकेला समस्यांचे ग्रहण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्टेट बँकेमार्फत सुरु केलेल्या धडगाव येथील बॅँक शाखेत केवळ धडगाव तालुक्यातलेच नव्हे तर अक्कलकुवा तालुक्यातील बहुतांश नागरिकही या शाखेचे ग्राहक आहे. शिवाय या बँकेवर धडगाव व मोलगी परिसरातील संपूर्ण शासकीय अर्थव्यवहार व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्यांचाही भार आहे. परंतु तेथे अपेक्षेनुसार मनुष्यबळ नसल्याने ग्राहक वेठीस धरले जात आहे. ही समस्या बँकेला लागलेले ग्रहणच ठरत आहे.
धडगाव - मोलगी परिसराचा व्याप लक्षात घेत स्टेट बँकेमार्फत धडगावसह खंटामोडी व चुलवड येथे शाखा सुरू करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीयकृत बँक असल्याने परिसरातील नागरिकांनी या बँकांमधून आर्थिक व्यवहार सुरू केला होता. चुलवड या माजी आमदारांच्या गावातील बँक शाखा सिसा, मनवाणी, राडीकलम, कुसुमवेरी, जर्ली, पालखा, बिलबारा, मनखेडी, सुर्यपूर, गौऱ्या, बिजरी, सिरसाणी, कालीबेल, तलाई, नवागाव, चांदसैली, वेलीआंबा, पिपलबारी, पांडामुंड, पाडली, काकरपाटी, असली, रमसुला यासह अन्य गावातील नागरिकांना आर्थिक व्यवहारासाठी सोयीस्कर ठरत होती. तर खंटामोडीची शाखा कुंडल, वरखेडी, खांडबारा, खडक्या, कात्री, हातधुई, टेंबला, खर्डा, मोख, मोजरा यांच्यासह अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी, भांगरापाणी, उमटी, पिंवटी, जामली, चनवाई, वेरी, कंजाला, डेब्रामाळपासून ते थेट नर्मदा नदी काठापर्यंतच्या नागरिकांसाठी सोटीची होती. परंतु या दोन्ही शाखा काही कारणास्तव बंद पडल्या. तेथील ग्राहक धडगाव शाखेकडे वळविण्यात आल्या. तिन्ही शाखांमधील ग्राहकांमुळे धडगाव स्टेट बँकेची ग्राहक संख्या काही पटींनी वाढली.
आधिच या शाखेत शासनाच्या सर्वच विभागांचा अर्थिक व्यवहार, संपूर्ण धडगाव तालुक्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या शिष्यवृत्यांचेही कामकाज याच शाखेत करण्यात येते. एवढा भार असतानाच दोन्ही शाखा वळविण्यात आल्याने धडगाव बँक प्रशासनाची डोकेदुखी वाढली. दोन लाखापेक्षा अधिक खात्यांचा भार असूनही केवळ तीन-चारच अधिकारी नेमण्यात येते. तेथे सेवा बजावणाºया कर्मचाऱ्यांपाठोपाठ खातेदारांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या बॅँक शाखेला समस्यांचे ग्रहण लागल्याचे म्हटले जात आहे. हे ग्रहण सोडविण्यासाठी व ग्राहकांना वेळेवर सेवा देण्यासाठी अपेक्षेनुसार मनुष्यबळ वाढविण्यात यावे, अशी मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.

धडगावची शाखा सर्वाधिक ग्राहक संख्येच्या पहिल्या दोन शाखांमध्ये स्थान निर्माण केले आहे. ग्राहकांच्या तुलनेतच मनुष्यबळही अपेक्षित आहे. परंतु तसे बँक प्रशासनामार्फत करण्यात येत नाही. त्यामुळे मनुष्यबळाच्या बाबतीत ही शाखा शेवटची ठरत आहे. सर्वाधिक ग्राहक अन् सर्वात कमी मनुष्यबळ या विरोधाभासामुळे या बँक शाखेच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. उलट वाढत्या लोकसंख्येमुळे त्यात भर पडत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी बँक प्रशासनामार्फत अपेक्षेनुसार सुविधांसाठी मनुष्यबळही उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी होत आहे.

पासबुक छपाईसाठीही लागतात लांबवर रांगा
अवघ्या सातपुड्यातील एकमेव एटीएम मशिन तेही शाश्वतीरहित
कॅश डिपॉझिट मशिन (सीडीएम) सुविधेचा अभाव
काम होत नसल्याने बँक ग्राहकांना माराव्या लागतात वारंवार फेºया

Web Title: Dhadgaon State Bank accepts problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.