धडगाव येथे दुकान फोडून रक्कम लांबविली
By Admin | Updated: March 15, 2017 00:31 IST2017-03-15T00:31:56+5:302017-03-15T00:31:56+5:30
नंदुरबार : धडगाव शहरातील किराणा दुकान फोडत त्यातून चोरट्याने १६ हजार रुपये लांबवल्याची घटना घडली़

धडगाव येथे दुकान फोडून रक्कम लांबविली
नंदुरबार : धडगाव शहरातील किराणा दुकान फोडत त्यातून चोरट्याने १६ हजार रुपये लांबवल्याची घटना घडली़ मंगळवारी पहाटे ही घटना घडली़ याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली़
धडगाव येथील पाटीलबाबा चौकात कल्पेश किराणा दुकानाचे शटर तोडल्याचे मंगळवारी सकाळी दुकानमालक पंकज रामोळे यांना दिसून आले़ त्यांनी आत पाहिले असता, सहा हजार रुपयांच्या नोटा आणि १० हजार रुपयांची चिल्लर चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले़ त्यांनी धडगाव पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला़ पोलिसांनी या घटनेचा तत्काळ तपास करत संशयित आरोपी नाना जामसिंग पाडवी, रा़ मांडवी याला ताब्यात घेण्यात आले आहे़ पोलिसांनी संशयित नाना पाडवी यास ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू केल्याची माहिती दिली आहे़