भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन, श्रावण सोमवारनिमित्त प्रकाशा येथे गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:36 IST2021-08-17T04:36:39+5:302021-08-17T04:36:39+5:30
दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी ...

भाविकांनी बाहेरूनच घेतले दर्शन, श्रावण सोमवारनिमित्त प्रकाशा येथे गर्दी
दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे श्रावण महिन्यात महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातील भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी मंदिर बंद होते तरी भाविकांनी बाहेरुन दर्शन घेतले. भाविकांनी कोरोना नियमांचे पालन करीत तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंग ठेवत बाहेरुन दर्शन घेतले. या वेळी केदारेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील, संचालक सुरेश पाटील, गुड्डू पाटील, गजानन भोई आदी उपस्थित होते. प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार सुनील पाडवी, रामा वळवी, विकास शिरसाठ यांनी बंदोबस्त ठेवला होता.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त झाला असून येथील केदारेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी मंदिर ट्रस्ट, भाविक व पुजारी यांच्याकडून होत आहे.
कानुमाता विसर्जनासाठी गर्दी
जिल्हाभरात रविवारी कानुबाई माता उत्सव साजरा करण्यात आला. सोमवारी येथील तापी नदीकाठावर प्रकाशासह परिसरातील भाविकांनी कानुबाई मातेच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती. तापी नदीला पाणी आहे म्हणून आलेल्या भाविकांनी घाटावर येऊन पूजाविधी करून कानुबाई मातेला निरोप दिला.