‘श्रीं’च्या गोतावळ्यापुढे भाविक लीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:15 IST2019-09-03T12:14:46+5:302019-09-03T12:15:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यभर गोतावळ्याच्या अनोख्या परंपरंपरेमुळे नंदुरबारातील गणेशोत्सव प्रसिद्ध आह़े दादा, बाबा, मामा, तात्या, भाऊ आणि ...

Devotees lean forward in 'Mr. | ‘श्रीं’च्या गोतावळ्यापुढे भाविक लीन

‘श्रीं’च्या गोतावळ्यापुढे भाविक लीन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यभर गोतावळ्याच्या अनोख्या परंपरंपरेमुळे नंदुरबारातील गणेशोत्सव प्रसिद्ध आह़े दादा, बाबा, मामा, तात्या, भाऊ आणि काका या गोतावळ्यातील बाप्पांचे सोमवारी  आगमन झाल्यानंतर भाविक त्यांच्या चरणी नतमस्तक होत होत़े   भाविकांची प्रतिक्षा सोमवारी सकाळी संपल्यानंतर गोतावळ्यातील बाप्पांच्या दर्शनसाठी शेकडांच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती़ 
श्रीमंत दादा गणपती       
शहरातील गणेश मंडळांना शतकी परंपरा आह़े लोकमान्य टिळकांनी 1853 पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्याच वषार्पासून नंदुरबार शहरातही सार्वजनिक गणेशोत्सव सुरु झाला़ आजतागायत ही परंपरा अखंड सुरू आहे. शहरातील शिवाजी रोडवरील देसाईपु:यात श्रीमंत दादा गणपतीची स्थापना ही सर्वात प्रथम करण्यात आली होती़ नंदनगरीचा राजा असे संबोधन असलेल्या दादा गणपतीच्या आगमनाने भाविकांमध्ये उत्साह निर्माण झाला आह़े  सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात येणा:या दादा गणपतीची मूर्ती ही काळ्या मातीपासून तयार करण्यात येत़े रथावर विराजमान असलेल्या या गणपतीची विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी गुजरातसह संपूर्ण जिल्ह्यातील भाविक 10 दिवस हजेरी देतात़ नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने याठिकाणी संपूर्ण 10 दिवस नवस फेडणारे भाविक उपस्थित असतात़ 
शहरातील मूर्तीकार गोपाळ सोनवणे, संतोष सोनवणे, प्रकाश सोनवणे, जगदिश सोनवणे यांनी यंदा काळ्या मातीपासून पारंपरिक पद्धतीने श्रीमंत दादा गणपतीची मूर्ती तयार केली आह़े उत्सव समितीचे अध्यक्ष नीलेश सोनार, कार्याध्यक्ष सोनल सराफ, उपाध्यक्ष वसंत सोनार, मनोज जाधव, खजिनदार अमित सराफ, सचिव उदय कासार, सहसचिव निखील सोनार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकारिणीतील सदस्य व कार्यकर्ते मंडळाचे काम पाहात आहेत़ 
श्रीमंत बाबा गणपती       
शहरातील दुस:या क्रमांकांचा मानाचा गणपती म्हणून श्रीमंत बाबा गणपती ओळखला जातो़ टिळक रोडवरील सोनार गल्लीत रथावरच पारंपरिक काळ्या मातीपासून बाबा गणपतीची मूर्ती घडवली जात़े मूर्तीला आकार दिल्यानंतर त्यावर चांदीचा मुकूट, दुर्वा, सोंडपट्टा, जानवे, मोदक, मूषक, दात, गळ्यातील हार, दुर्वाची माळ आदी सोने चांदीचे अलंकार चढवले जातात़ भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मूर्तीच्या दर्शनसाठी पहाटेपासून रात्री उशिरार्पयत भाविकांची गर्दी होत़े 
शहरातील मूर्तीकार अजय पाटील यांनी यंदा श्रीमंत बाबा गणपतीची मूर्ती तयार केली आह़े त्यांना मंडळाच्या कार्यकत्र्यानी मदत केली़ उत्सव समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे  यंदा मोरेश्वर सोनार यांच्याकडे आहेत़ उपाध्यक्ष राकेश सोनार, कार्याध्यक्ष गौरव सोनार, सचिव दिलीप पंडित, सहसचिव प्रसाद सोनार, खजिनदार दर्शन सोनार, सहखजिनदार प्रसाद सोनार तसेच पदाधिकारी, कार्यकारिणीतील सदस्य व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
मानाचा तात्या गणपती       
या मालिकेतील तिसरे स्थान हे मानाच्या तात्या गणपतीला जात़े भोईगल्लीत नारायण विठ्ठल पाटील यांनी या तात्या गणेशोत्सवाची सुरुवात केली होती़ 85 वर्षापासून अविरत असलेला त्यांचा वारसा त्यांची मुले चालवत आहेत़ 11 किलो चांदीचे सिंहासन आणि विविध अलंकारांनी आभूषित असलेल्या या मूर्तीला पारंपरिक विसजर्न मिरवणूकीत मानाचे स्थान असत़े 
मानाचा काका गणपती       
मानाच्या काका गणपतीची स्थापना करण्याचा मान सुपडू शिवराम सोनार यांना जातो़ काळ्या मातीपासून हाताने तयार होणा:या छोटेखानी आकर्षक काका गणपतीची मूर्ती भाविकांचे श्रद्धास्थान आह़े गणेशोत्सव काळात येथे दर्शनसाठी भाविकांची गर्दी होत़े 
मानाचा मामा गणपती       
मानाच्या मामा गणपतीची स्थापना प्रथम चंदूलाल गोविंद सोनार यांनी केली होती़ सोनार हे हाताने मामा गणपतीची मूर्ती तयार करत असत़ या गणपतीचे यंदाचे शंभरावे वर्ष असून यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत़  
मानाचा मामा गणपती       
मानाच्या भाऊ गणपतीची सुरुवात अहिर सोनार अर्थात यादव मास्तर यांनी केली होती़ त्यांच्यानंतर अमृतलाल छगनलाल सोनार यांनी भाऊ गणपतीची परंपरा जोपासली होती़ विसजर्न मिरवणूकीत गोतावळ्यातील गणेश मंडळांना अग्रस्थान दिले जात़े 

उत्सव मोठय़ा धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आल्याची माहिती श्रीमंत दादा आणि बाबा गणेश मंडळांच्या पदाधिका:यांनी दिली़  दोन्ही मंडळांमध्ये सालाबादाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या विविध सांस्कृतिक  व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल आह़े 11 दिवस सायंकाळी हे कार्यक्रम होणार आहेत़ दोन्ही मंडळांमध्ये महिलांच्या अधिक सहभाग असल्यामुळे शिस्तीला अधिक महत्त्व देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े सोमवारी दिवसभरात याठिकाणी भाविकांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली़ मानाच्या दादा, बाबा व मानाच्या गणपतींच्या आरतीसाठी सायंकाळी शहरातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होत़े 
 

Web Title: Devotees lean forward in 'Mr.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.