नर्मदा परिक्रमेसाठी शहाद्यातून भाविक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:19 IST2019-11-19T12:19:09+5:302019-11-19T12:19:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : नर्मदा परिक्रमेसाठी येथून भाविक पदयात्रेने रवाना झाले. मोहिदा येथील अयोध्या नगरातून या भाविकांची वाजत-गाजत ...

नर्मदा परिक्रमेसाठी शहाद्यातून भाविक रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : नर्मदा परिक्रमेसाठी येथून भाविक पदयात्रेने रवाना झाले. मोहिदा येथील अयोध्या नगरातून या भाविकांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. ब्राrाणपुरी येथील ह.भ.प. खगेंद्र महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 24 भाविक या पदयात्रेत सहभागी झाले असून नर्मदा परिक्रमेसाठी सुमारे साडेचार महिने लागणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
नर्मदा परिक्रमेसाठी सहभागी झालेल्या भाविकांची मिरवणूक काढण्यात येऊन नर्मदा मातेचा जयघोष करण्यात आला. तत्पूर्वी महाप्रसाद वाटप करण्यात आला. मिरवणुकीचा समारोप येथील सप्तशृंगी माता मंदिराजवळ झाला. तेथे ह.भ.प. खगेंद्र महाराज म्हणाले की, नर्मदा परिक्रमेमुळे सर्व पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्तीस जातो. नर्मदेचा प्रत्येक कंकर हा शंकर आहे व त्याच्या दर्शनाने कोटी शिव दर्शनाचा लाभ होतो, असे खगेंद्र महाराज यांनी सांगितले. या वेळी माजी नगरसेवक योगेश चौधरी, दिलीप चौधरी, जिल्हा बँकेच्या बोरद शाखेचे शाखाधिकारी राजेंद्र कलाल आदी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता वाहनाने सर्व पदयात्री ओंकारेश्वर येथे रवाना झाले असून पदयात्रा 18 नोव्हेंबरपासून तेथून पदयात्रा सुरु होणार आहे. नर्मदा परिक्रमेचा प्रवास तीन हजार 340 किलोमीटरचा असून त्यासाठी सुमारे साडेचार महिन्यांचा कालावधी लागतो. ही पदयात्रा 1 डिसेंबर रोजी तळोद्यात येणार असून तेथे त्यांचे स्वागत होऊन राजेंद्र कलाल यांच्याकडून महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.