गुलीआब्यांतही गावविकास कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:43 IST2019-11-08T12:43:19+5:302019-11-08T12:43:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सामुहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 27 गावांमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा या गावाचा देखील समावेश आहे. ...

Development plan of village development in Guliabia too | गुलीआब्यांतही गावविकास कृती आराखडा

गुलीआब्यांतही गावविकास कृती आराखडा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सामुहिक वनहक्क प्राप्त झालेल्या 27 गावांमध्ये अक्कलकुवा तालुक्यातील गुलीआंबा या गावाचा देखील समावेश आहे. तेथील वनहक्क क्षेत्राच्या विकासासाठी पथदर्षी प्रकल्प हाती घेण्यात आला असून विकास कामांसाठी  सुक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. 
जिल्ह्यातील वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी गुलीआंबायेथे वन व्यवस्थापन समिती स्थापना करण्यात आली आहे. लोकसमन्वय प्रतिष्ठान या संस्थेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहभागातून या समित्यांमार्फत  कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रांजेंद्र भारूड  यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कॅनव्हर्जन समितीने पुढाकार घेतला असून वन विभागाचे देखील  सहकार्य लाभत आहे. त्यानुसार गुलीआंबा येथे वन समिती व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी सरपंच विजय  पाडवी, अशोक पाडवी,  देविसिंग वळवी, अनिल वसावे, भिका वसावे, बिरम्या वळवी, बाज्या  वळवी आदी  उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी नकाशा तयार करीत त्यातून गावाचा विकास कसा करता येईल याचा आराखडा तयार करीत संभाव्य विकासाचे महत्व पटवून दिले. त्यात सामूहिक वन हक्क हे आदिवासींच्या विकासातील एक नवपर्वणी ठरणार आहे. या नवनिर्मितीतूनच आदिवासी विकासाचा नवा इतिहास  देखील घडणार असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले. 

सामुहिक वनहक्क प्राप्त गुलीआंबा या गावात सरपंच नोमाबाई वसावे, उपसरपंच मैनावती पाडवी, ग्रामसेविका वैशाली गिरासे तर तलाठी म्हणून अनिता वसावे हे गावविकासासाठी कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच वनहक्क क्षेत्रांतर्गत काम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Development plan of village development in Guliabia too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.