देवदर्शन होतेय; परंतु मंदिराबाहेरूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST2021-06-29T04:21:15+5:302021-06-29T04:21:15+5:30
नंदूरबार : शहरातील विविध भागांतील मंदिरे बंद आहेत. यातून दर्शन घेणारे भाविक बाहेरूनच दर्शन घेत आहेत. रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त ...

देवदर्शन होतेय; परंतु मंदिराबाहेरूनच
नंदूरबार : शहरातील विविध भागांतील मंदिरे बंद आहेत. यातून दर्शन घेणारे भाविक बाहेरूनच दर्शन घेत आहेत. रविवारी संकष्ट चतुर्थीनिमित्त मंदिरांच्या बाहेरूनच बाप्पाचे दर्शन घेणारे दिसून येत होते. शहरातील दंडपाणेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येत होते. परंतु शासनाच्या आदेशाने मंदिर बंद ठेवण्यात आल्याने भाविकांकडून बाहेरूनच दर्शन घेतले जात हाेते. जिल्ह्यातील इतर भागांतील मंदिरेही कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली आहेत. यामुळे भाविकांचा हिरमोडही होत आहे.
बाजार समित्यांमध्ये जनजागृतीची गरज
नंदूरबार : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये भाजीपाला तसेच किरकोळ भुसार मालाची खरेदी अद्यापही सुरू आहे. यासाठी बाहेरगावाहून शेतकरी येत आहेत. बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना कोविड नियमांची माहिती देण्याची गरज आहे. बाजार समित्यांमध्ये कोविड नियमांचे पालन कटाक्षाने करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.