कोट्यावधी रूपये खर्च करूनही खुर्चीमाळ ओरपा रस्ता निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:02 IST2021-02-03T13:02:06+5:302021-02-03T13:02:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर ‌: अक्कलकुवा तालुक्यातील नवलपूर, सोजडबारपाडा, माळ, खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च ...

Despite spending crores of rupees, Khurchimal Orpa road is useless | कोट्यावधी रूपये खर्च करूनही खुर्चीमाळ ओरपा रस्ता निकामी

कोट्यावधी रूपये खर्च करूनही खुर्चीमाळ ओरपा रस्ता निकामी

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर ‌: अक्कलकुवा तालुक्यातील नवलपूर, सोजडबारपाडा, माळ, खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर कोट्यावधी रुपये खर्च करून ही या खुर्चीमाळ ओरपा घाट सेक्शनचा रस्त्यावरील मोठमोठे दगड गोटे पडून आहेत. या रस्त्यावर फोरव्हीलर तर दूरच साधी मोटारसायकलही निघू शकत नसल्याने या सातपुड्याच्या डोंगर माथ्यावरील नागरिकांना खडतर रस्त्यावरून मोटारसायकल उचलून पायपीट करीत मार्ग काढावा लागतो. 
दरम्यान, मोटारसायकलस्वार खुर्चीमाळ व माळ ओरपा दरम्यानच्या उडाणबारा ते बालेखाच्यापाडा या दोन किलोमीटर रस्त्यावरील दगड- गोटे बाजूला करीत मार्ग काढत पाटबारा येथील अंत्यविधीच्या कार्यक्रमाला चार तासांच्या परिश्रमानंतर पोहचतात. पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत २०१३ मध्ये मंजूर झालेला नवलपूर खुर्चीमाळ, ओरपा या घाट सेक्शन रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा रस्ता आहे तसाच आहे. नेदवान खुर्चीमाळ, माळ ओरपा दरम्यानच्या घाट सेक्शन रस्त्यावर पावसाळ्यात दरड व मातीचा मलबा कोसळून रस्ता बंद पडला असताना संबंधित विभागाकडून किंवा ठेकेदाराकडून साधी दखल घेतली जात नसल्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी भाजप प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी जेसीबीने स्वत: उभे राहून दरड व मातीचा मलबा साफ करून रस्ता साफ केला होता. परंतु त्यानंतर या खुर्चीमाळ ओरपा या घाट सेक्शन रस्त्यावर पावसाळ्यात दरड मातीच्या मलबा पडून आहे.
दरम्यान पाटबारा येथील जिल्हा परिषद सदस्यांच्या येथे अंत्यविधीच्या कार्यासाठी निघालेले पोलीस पाटील लक्ष्मण नाईक खुर्चीमाळ,  पुन्या वसावे डोगरीपाडा, बाज्या वसावे, जयसिग नाईक उम्रपाणीपाडा, ईश्वर वसावे डोगरीपाडा, सायसिग वसावे, शंकर खाल्या वसावे उपसरपंच उमरागव्हाण, मंगलसिग वसावे ओरपा, नानसिग नाईक, मंगलसिग नाईक खुर्चीमाळ यांना दोन किलोमीटरच्या रस्तावरील दगड गोटे स्वता बाजूला करून पाटबारा येथील अंत्यविधीला चार तासांनंतर पोहोचावे लागले.  खुर्चीमाळ व माळ ओरपा रस्त्यावरील नेदवानच्या खडच्यापाडा, आबारीपाडा, खडकीपाडा, माळ डोगरीपाडा उमराईपाडा कुंभवीपाडा येथील नागरीकांना दोन ते अडीच किलोमीटर खडतर पायवाटेने माळ ओरपाच्या मुख्य रस्त्यापर्यंत पर्यंत जावे लागत असते.

Web Title: Despite spending crores of rupees, Khurchimal Orpa road is useless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.