खाजगी कंपनीतील नोकर कपातीने हताश युवकाने कवटाळले मृत्यूला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 11:19 IST2020-09-10T11:19:19+5:302020-09-10T11:19:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वडाळी : कोरोनामुळे पुणे येथील खाजगी कंपनीत झालेली नोकर कपात आणि त्यामुळे बेरोजगारीच्या सोसाव्या लागणाऱ्या झळा ...

खाजगी कंपनीतील नोकर कपातीने हताश युवकाने कवटाळले मृत्यूला
लोकमत न्यूज नेटवर्क
वडाळी : कोरोनामुळे पुणे येथील खाजगी कंपनीत झालेली नोकर कपात आणि त्यामुळे बेरोजगारीच्या सोसाव्या लागणाऱ्या झळा यामुळे नैराश्येतील युवकाने मामाचे गाव गाठत थेट गळफास लावला. कोरोनामुळे अनेकांचे जीवन उध्वस्त झाले असून अनेकजण बेरोजगार झाले आहेत. नैराश्य आलेल्या आणि नोकरी गमावलेल्या युवकांना समुपदेशन गरजेचे आहे. दरम्यान, लोहारा येथील युवक आणि वडाळी येथे केलेली आत्महत्या यामुळे या दोन्ही गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रकाश अंबालाल चौधरी (२८) रा. लोहारा ता. शहादा असे मयत युवकाचे नाव आहे. आयटीआयचा डिप्लोमा करून पुणे येथील एका खाजगी कंपनीत गेल्या आठ वषार्पासून कामाला होता. गेल्या सहा महिन्यापासून कोरोना आजाराच्या प्रादुभार्वामुळे कर्मचारी कपातच्या नावाखाली त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे बेरोजगारीच्या नैराश्येत तो होता. पुणे येथे घर भाडे, खानवळ खर्च यामुळे कर्जबाजारी झाला होता. दोन दिवसांपूर्र्वी त्याने वडाळी येथे आपल्या मामाच्या गावाला आला होता. बुधवार, ९ रोजी परस्पर मामाच्या शेतात जाऊन त्याचा मोठा भाऊ व अहमदाबाद येथे खाजगी कंपनीत असलेला किरण अंबालाल चौधरी यास फोन लावला. भाऊ मी आता जीवन यात्रा संपवतोय, आईकडे लक्ष ठेव, काळजी घे असा फोनवर बोलला. भावाचा असा फोन ऐकून किरण बेचैन झाला त्याने त्वरित आपला मामा दीपक गोरख पाटील यांना फोनवर कळवले.
दीपक पाटील आपल्या काकाच्या मुलासोबत आपल्या शेतात पोहोचले असता प्रकाशने निंबाच्या झाडाला दोर लावून गळफास घेतला. दीपक पाटील यांनी सारंखेडा पोलीस स्टेशनला लगेच खबर दिली. सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून शहादा नगरपालिकाच्या दवाखान्यामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पुढील तपास चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे लोहारा आणि वडाळी येथे हळहळ व्यक्त होत आहे.
मी माझ्या आत्महत्येलाि स्वत: जबाबदार आहे. हात जोडून, पाया पडून तुमची सर्वांची माफी मागतो. मीस यू भाविक भाऊ... सर्व जन मिळून ताई अर्थात आईला खूश ठेवा... आपलाच प्रकाश... असा मजकूर मृत्यूपूर्व चिठ्ठीत लिहिला आहे. पोलिसांनी चिठ्ठी ताब्यात घेतली आहे. एकुण घटना क्रमावरून अक्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.