हताश बाप अन् रस्त्याची धाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 12:13 IST2020-09-04T12:13:37+5:302020-09-04T12:13:46+5:30

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथील लोकांना एखादा रुग्ण आजारी पडला ...

Desperate father and breath of the road! | हताश बाप अन् रस्त्याची धाप!

हताश बाप अन् रस्त्याची धाप!



किशोर मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहिर : सातपुड्याच्या दुर्गम भागात रस्तेच नसल्याने तेथील लोकांना एखादा रुग्ण आजारी पडला तर त्याच्या नातेवाईकांना बांबूची झोळी करून रुग्णालयापर्यंत न्यावे लागते ही नेहमीचीच उदाहरणे आहेत. पण आजारी रुग्णाला जेव्हा बांबूच्या झोळीत नेण्यासाठी चार लोकंच मिळत नाहीत तेंव्हा रुग्णाच्या एखाद्या नातेवाईकाला आपल्या खांद्यावर घेऊनच रुग्णालयाची वाट धरावी लागते, ही बाबही आता समोर आली आहे. अक्कलकुव तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा या गावापासून हमरस्त्यावर येण्यासाठी रस्ताच नाही. जो आहे तो गुडघ््या इतक्या चिखलाने भरला आहे. याच रस्त्यावरून गुरुवारी एका हताश बापाला आपल्या अपंग मुलाला रुग्णालयात आणण्यासाठी त्याच्या खांद्यावर मुलाचे ओझे घेऊन पायपीट करावी लागल्याची दुर्दैवी घटना घडली.
ही घटना आहे अक्कलकुवा तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा येथील. रामजी रुमा वसावे यांचा १६ वर्षीय मुलाला अचानक एका पायाने अपंगत्व आले. त्याला उभे राहणेही जिकरीचे जाऊ लागले. वेदना अधीक असह्य झाल्याने आई-बापाच्या मनातील कालवाकालव वाढली. आताच दवाखान्यात न्यावे यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. गाव ते जवळच्या निंबीपाडापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाट पुर्ण चिखलाने आणि दगडगोट्यांनी भरलेली. करायचे काय? बांबूला झोळी बांधून न्यावी तर सोबत कुणीच नाही.
आजूबाजूचे राहणारे सर्व शेतात कामासाठी गेलेले. ते येतील तोपर्यंत अंधार होईल. त्यामुळे मुलाच्या आईने तयारी दर्शविली. परंतु तिच्याकडून बांबूच्या झोळीचे वजन उचलले जात नव्हते. अशा वेळी पित्यानेच मुलाला वाचविण्यासाठी त्याला थेट खांद्यावर घेतले आणि एक किलोमिटरची चिखलाच ती देखील दऱ्याखोºयातील पायवाट तुडवली.
एक किलोमिटर अंतरावरील पाटीलपाडापर्यंत नेल्यावर तेथे दुचाकीच सोय झाली. पाटीलपाडा ते निंबीपाडा हा पुन्हा एक किलोमिटरचा तसाच खाचखळगे आणि चिखलाचा. तो देखील दुचाकीवर पार करण्याचे दिव्य कसेबसे पार पडले. तेथून वाहनाद्वारे आपल्या पोटच्या गोळ्याला गुजरातमधील मालसमट येथील दवाखान्यात दाखल केले. ४सातपुड्यातील अनेक गाव व पाडे पावसाळ्यात मुख्य प्रवाहापासून तुटतात. दळणवळण यंत्रणा खंडित होते. कुणी आजारी पडले तर त्यांना बांबूच्या झोळीतून न्यावे लागते. त्यासाठी दºयाखोºयातील पायवाट तुडवावी लागते. दरवर्षाची ही स्थिती असते.
४यामुळे अनेकांचा अर्ध्या वाटेवरच जीव जातो. अनेकांना कायमचे अपंगत्व भोगावे लागते. कायमस्वरूपी उपाययोजनांबाबत कुणीही गांभिर्याने घेत नाही.
४दरवर्षाची स्थिती असल्याने रोज मरे त्याला कोण रडे अशी स्थिती सातपुड्यातील दुर्गम भागातील आहे. ४पावसाची संततधार सुरू असल्याने मातीच्या रस्त्यावर पावसामुळे चिखल होवुन जातो. चिखलीच्या आसनबारीपाडा-पाटीलपाडा ते निंबीपाडा दोन किलोमीटर मातीच्या चिखलमय रस्ता आहे. त्यात एक किलोमीटर आसनबारीपाडा ते पाटीलपाडा खुपच चिखलमय असल्याने मोटरसायकल देखील निघु शकत नाही. त्यामुळे बांबूलेन्स शिवाय पर्याय नसतो.
४यासाठी किमान चार जणांची आवश्यकता असते. परंतु तेवढेजण उपलब्ध झाले नाहीत तर अडचणींचा सामना करावा लागतो. लहान मुलं राहिले तर आई व वडिल त्याला खांद्यावर घेऊन जाऊ शकतात. मोठी माणसं राहिली तर मात्र मोठी समस्या निर्माण होते.

Web Title: Desperate father and breath of the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.