आरोग्य सेविकांची प्रतिनियुक्ती रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:18 IST2020-05-14T10:18:34+5:302020-05-14T10:18:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव येथे देण्यात आलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी परिचारिकांनी ...

Deputation of health workers should be canceled | आरोग्य सेविकांची प्रतिनियुक्ती रद्द करावी

आरोग्य सेविकांची प्रतिनियुक्ती रद्द करावी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव येथे देण्यात आलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी परिचारिकांनी केली आहे़ महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हा शाखेने हे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे़
परिचारिकांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात, जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना मालेगाव महानगरपालिका येथे प्रतिनियुक्ती देण्यात आलेली आहे़ मार्च २०२० पासून देशात व महाराष्ट्राचा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ राज्यात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे़ अशावेळी शासनस्तरावर काम करणाऱ्या आरोग्य सेविका ह्या सर्व्हे करणे, रुग्णांना दाखल करणे, क्वारंटाईन करणे आदी कामे करत आहेत़ दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या क्वारंटाईन कक्षात परराज्यातून येणाºया स्थलांतरीत मजूरांच्या तपासण्या करत आहेत़ कंटेन्मेंट झोनसह विविध ठिकाणी आरोग्य सेविका काम करत आहेत़ केलेल्या सर्वेक्षणांचे अहवाल नियमित जिल्हा परिषदेत देत आहेत़ मालेगाव हे शहर रेड झोनमध्ये आहे़ याठिकाणी सेवा देत असताना आरोग्यसेविकांना कोरोनाची बाधा होण्याची व तेथून परतल्यानंतर कुटूंबिय किंंवा इतर सहकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे़ प्रतिनियुक्ती दिलेल्या सर्वांच्या घरी वृद्ध आई-वडील, सासू-सासरे, लहान मुले असल्याने सहानूभूती म्हणून हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे़
यावेळी सुरेखा वळवी, सिंधू गवळी, सुनिता वळवी, जे़ए़ संदानशिव, आशा घुगे, मिनाक्षी वळवी, मनीषा पाटोळे, कस्तुरा पाडवी आदी आरोग्य सेविका उपस्थित होत्या़

आरोग्यसेविकांनी पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़पाडवी यांनाही हे निवेदन पाठवले असून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांची भेट घेत त्यांना माहिती दिली आहे़ सर्वच आरोग्यसेविका कोरोना व्यतिरिक्त सर्वे निर्देशांक निहाय काम, नियमित प्रसूती, संदर्भ सेवा, माता व बालसंगोपनाची कामेही करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले़

Web Title: Deputation of health workers should be canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.