पुरबाधा टाळण्यासाठी नाला खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 12:24 IST2020-03-19T12:24:45+5:302020-03-19T12:24:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे ...

Depth drain to prevent supply | पुरबाधा टाळण्यासाठी नाला खोलीकरण

पुरबाधा टाळण्यासाठी नाला खोलीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
चिंचपाडा : मागील तीन वर्षांपासून चिंचपाडा ता. नवापूर येथील १७ घरांमध्ये पावसाळ्यात पुराचे पाणी शिरुन घरांचे नुकसान होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तेथे नाला खोलीकरणच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
चिंचपाडा हे गाव झोडंबी तथा मसावट नाल्यावर वसले असून या नाल्याला काही उपनाले देखील आहे. या सर्व नाल्यांचे पाणी एकत्र झाल्यास मोठ्या नाल्यातील पाणी थेट नागरी वसाहतीत शिरते. त्यात घरांचे नुकसान होऊन संसार उघड्यावर येतात. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत चिंचपाडा येथील नागरिकांमध्ये पुराची भिती निर्माण होते. अशी परिस्थिती मागील दोन वर्षांपासून पावसाळ्यात उद्भवत आहे. मागील पावसाळ्यात १७ घरांमध्ये नाल्याचा पुर शिरल्याची नोंद महसुल विभाग व ग्रामपंचायतीकडे करण्यात आली, त्यात नुकसानग्रस्त कुटुंबियांचा संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. तर २०१८ व २०१७ मधील पावसाळ्यात प्रत्येकी नऊ घरांमध्ये पुराचे पाणी शिरत त्यांचेही मोठे नुकसान झाले.
तीन वर्षांपासून होणाऱ्या या नुकसानीबाबत नुकसानग्रस्तांसह तेथील नारिकांनी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यात नागरिकांनी गावातील मुख्य नाल्याचे खोलीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे शासनाच्या निदर्शनास आणून दिले. नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संबंधित विभागामार्फत गावातील नाल्याचे खोलीकरणसाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाकडून मंजूरी देखील देण्यात आली. शिवाय १८ लाखाची निधी जिल्हा वार्षिक नियोजनमधून उपलब्ध करुन देण्यात आला. निधीही उपलब्ध करुन दिल्यामुळे आमागी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणेमार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे.
शासनामार्फत नाल्या खोलीकरणचे काम सुरु केल्यामुळे पुढील पावसाळा फारसा संकटाचा राहणार नसल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. शिवाय नाला खोल राहिल्यास काही प्रमाणात पुरपरिस्थितीवर मात देखील करता येईल, असे मतही तेथील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

गावात उद्भवणारी पुरपरिस्थितीवर मात करण्यासाठी शसनामार्फत नाला खोलीकरणचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम एक कि.मी. व ८०० मिटरवर होणार आहे. त्यामुळे संपूर्ण चिंचपाडा गाव आगामी पावसाळ्यात सुरक्षीत राहतील अशी अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मुख्य मसावट नाल्याला अनेक उपनाले असल्यामुळे मुख्य नाल्याची खोली व रुंदी आवश्यकतेनुसार ठेवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे. तर नाला साफसफाईची अन्य सर्व कामेही तातडीने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Depth drain to prevent supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.