प्रकाशा परिसरात कोरोना लसीकरणाबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:31 IST2021-04-01T04:31:14+5:302021-04-01T04:31:14+5:30

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रकाशा, वैजाली, नांदर्डे, करणखेडा, करजर्ई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, पळासवाडा, ...

Depression about corona vaccination in light areas | प्रकाशा परिसरात कोरोना लसीकरणाबाबत उदासिनता

प्रकाशा परिसरात कोरोना लसीकरणाबाबत उदासिनता

सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत प्रकाशा, वैजाली, नांदर्डे, करणखेडा, करजर्ई, बुपकरी, लांबोळा, नांदरखेडा, पळासवाडा, वर्ढे, टेंभे आदी १३ गावे येतात. या गावांची लोकसंख्या लाखाच्या आसपास असेल. प्रकाशा आरोग्य केंद्रात १५ मार्चपासून कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार हे तीन दिवस लस देण्यात येते. मात्र, आतापर्यंत फक्त ७०० च्या आसपास कोरोना लस घेणाऱ्यांची संख्या झाली आहे. म्हणून परिसरात कोरोना लसीबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. प्रकाशा गावासह शहादा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. लॉकडाऊन करण्याची वेळ आली तरी लस घेण्यासाठी एवढी उदासिनता का? असा प्रश्न आरोग्य विभागाला आलेला आहे. लस टोचण्यासाठी प्रकाशा येथील आरोग्य विभाग, प्रकाशा ग्रामपंचायत यांच्याकडून जनजागृती सुरू आहे. गावातील फलक, सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जात आहे. १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. बावस्कर यांनी केले आहे.

लस पूर्णतः सुरक्षित आहे. लस दिल्यानंतर आम्ही लस घेणाऱ्याला अर्धा तास निगराणीत ठेवतो. आतापर्यंत कोणालाही काही त्रास झालेला नाही. तरी सर्वांनी लस टोचून घ्यावी.

-डॉ. बावस्कर, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रकाशा

Web Title: Depression about corona vaccination in light areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.