तळवेत श्रमदानातून नदी खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 20:25 IST2019-05-20T20:25:01+5:302019-05-20T20:25:23+5:30

दोधाळ नदीपासून सुरूवात : गावाचा उत्साह पाहून परिसरातील नागरिकांचाही सहभाग

Deposition of the river from the pouring labor | तळवेत श्रमदानातून नदी खोलीकरण

तळवेत श्रमदानातून नदी खोलीकरण

तळोदा : तालुक्यातील तळवे येथील गावकऱ्यांनी आपल्या परिसरातील सर्व नद्या नाल्यांचे खोली करणाचे काम हाती घेतले असून, या कामाचा शुभारंभ शनिवारी गावलगतच्या दोधाळ नदीपासून करण्यात आला. हे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे. तळवेकरांचे हे स्तुत्य काम पाहून आमलाड, मोरवड गावामधील रहिवाशांनीदेखील हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरणाअभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. ७० ते ८० फुलावरील पाण्याची पातळी यंदा तर २०० ते २५० फुटावर गेली आहे.
ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील तळवे येथील गावकऱ्यांनी आपल्या गावालगतच्या दोधाळ नदी बरोबरच परिसरातील सर्व नदी नाल्यांचा खोलीकरणाचा निर्णय घेतला. यात गावातील तरूणांचाच अधिक आग्रह होता. त्यानुसार या तरूणांनी गावात फिरून गावकºयांकडून या कामासाठी साधारण अडीच लाखाची लोकवर्गणी जमा केली. याशिवाय प्रति एकरी शेतकºयांकडून वर्गणीदेखील जमा करण्यात आली आहे.
या कामाचा शुभारंभ शनिवारी गावाजवळील दोधाळ नदीत पोकलॅण्ड मश्ीनाची पूजा ज्येष्ठ नागरिक गोविंदराव गागरे, विजय मुरार पाटील यांच्या हस्ते करून करण्यात आला.
या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निरज पाटील, पोलीस पाटील भरत पाटील, सरपंच कृष्णा पाडवी, उपसरपंच मंगेश तनपूरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र पाडवी, शरद पाडवी, सचिन पाटील, शांतीलाल गायकवाड, तंटामुक्ती समितीचे कांतीलाल साळुंखे, अनिल रतिलाल पाटील, नवनाथ ठाकरे, मोग्या भिल, संजय तनपूरे, राजेश पाटील, गोटू कलाल, उमेश पाटील, ईश्वर पाटील आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Deposition of the river from the pouring labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.