डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:06 IST2021-09-02T05:06:17+5:302021-09-02T05:06:17+5:30
नंदुरबार : सध्या सुरू असलेल्या डेंग्यू व मलेरियापासून मुक्तता मिळवण्यात ड्रॅगन फ्रूट हे गुणकारी असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर ...

डेंग्यूने वाढविला ड्रॅगन फ्रूटचा भाव !
नंदुरबार : सध्या सुरू असलेल्या डेंग्यू व मलेरियापासून मुक्तता मिळवण्यात ड्रॅगन फ्रूट हे गुणकारी असल्याची माहिती सोशल मीडियातून समोर आली होती. यातून डेंग्यूसदृश तापाची किंवा साध्या तापाची लागण झालेले इतर फळांपेक्षा ड्रॅगन फ्रूटला अधिक महत्त्व देत आहेत. यातून सध्या बाजारपेठेत या फळाची मागणी वाढली असल्याचे समोर आले आहे. नंदुरबार तालुक्यातून ड्रॅगन फ्रूटची आवक होत असल्याचे सांगण्यात आले.
सफरचंद स्वस्त
हिमाचल प्रदेशातून सफरचंदाची आवक वाढल्याने जिल्ह्यात सफरचंद स्वस्त झाले आहेत. सध्या १०० ते १२० रुपये प्रतिकिलो या दराने सफरचंद मिळत आहेत. यामुळे सध्या सफरचंदाची खरेदी वाढली आहे.
डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा
डेंग्यूवर ड्रॅगन फ्रूटचा उतारा काम करत असल्याच्या शक्यतांना मात्र वैद्यकीय सूत्रांकडून नकार देण्यात आला आहे. कोणतेही फळ हे शारीरिक क्षमतावाढीसाठी फलदायीच असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारात ड्रॅगन फ्रूटला मागणी असल्याचे चित्र असले तरी ही मागणी केवळ फळाची आवक म्हणून नागरिक त्याची खरेदी करतात. नवीन फळ असल्याने अनेकांना नावीन्य म्हणून खावेसे वाटते. परंतु डेंग्यू वगैरेवर उपायकारक असल्याची माहिती अद्याप कोणाकडून मिळालेली नाही.
- मोहिनीराज राजपूत, फळव्यापारी, नंदुरबार