शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:00 IST2019-10-11T11:59:17+5:302019-10-11T12:00:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील गांधीनगरात डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांचे सव्रेक्षण करणा:या पथकाला डेंग्यूचा फैलाव करणा:या डासांची निर्मिती ...

Dengue larvae have been found in Gandhinagar city | शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या

शहरातील गांधीनगरात आढळून आल्या डेंग्यूच्या अळ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील गांधीनगरात डेंग्यू सदृश तापाच्या रुग्णांचे सव्रेक्षण करणा:या पथकाला डेंग्यूचा फैलाव करणा:या डासांची निर्मिती करणा:या अळ्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आह़े यामुळे शहरात डेंग्यूचा फैलाव वाढत असल्याचे स्पष्ट झाले आह़े 
गाजीनगरातील 18 वर्षीय युवतीचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता़ घटनेनंतर गाजीनगर, गांधीनगर व धुळे चौफुली परिसरातील वसाहतींमध्ये हिवताप विभागाच्या पथकांनी गुरुवारी सकाळपासून पुन्हा सव्रेक्षण मोहिम सुरु केली होती़ यावेळी गांधीनगर भागात डासांची निर्मिती करणा:या अळ्या आढळून आल्या़ एका घरात रिकामे कुलर तसेच भांडय़ात साचलेल्या पाण्यात अळ्या दिसून आल्यानंतर पथकाने कारवाई करत सूचना केल्या होत्या़ 
दरम्यान शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये दर दिवशी डेंग्यूसदृश तापाची लागण झालेले किमान 50 रुग्ण आढळून येत आहेत़ हिवताप विभागाने आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी ठोस उपाययोजना मात्र झालेल्या नाहीत़ गंभीर आजारी रुग्ण धुळे किंवा सुरतकडे गेल्याने शहरातील रुग्णांची नेमकी संख्या समोर आलेली नाही़ 

डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आयएमएच्या जिल्हा शाखेनेही नागरिकांची जनजागृती सुरु केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ़ राजेश वळवी यांनी दिली आह़े  
वातावरणातील आद्र्रता वाढली असल्याने डेंग्यूच्या डासांच्या निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आह़े यातून डेंग्यूचा फैलाव वाढत आह़े यामुळे नागरिकांनी पाण्याची भांडी स्वच्छ करुन कोरडा दिवस पाळवा़ घराच्या परिसरात साचलेल्या पाण्याचा निचरा करावा़ 
डासांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी उपायोजना कराव्यात़ डेंग्यू झालाच तर भरपूर पाणी प्यावे, आराम करावा तसेच तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा़ 
ताप येणे, अंग दुखी, डोकेदुखी, उलटय़ा होणे, पोटात दुखल्यास तातडीने तज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत़ 
 

Web Title: Dengue larvae have been found in Gandhinagar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.