नंदुरबारात डेंग्यूची लागण, आठ जण धुळे येथे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 11:50 IST2019-09-26T11:49:58+5:302019-09-26T11:50:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील नवनाथनगर, बागवान गल्ली, आंबेडकर चौक, साक्रीनाका या परिसरासह अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून ...

नंदुरबारात डेंग्यूची लागण, आठ जण धुळे येथे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातील नवनाथनगर, बागवान गल्ली, आंबेडकर चौक, साक्रीनाका या परिसरासह अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. आठ ते दहा जणांना धुळे येथे सरकारी व खाजगी रुग्णांलयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पालिकेने आणि आरोग्य विभागाने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
नंदुरबारात मलेरिया नंतर डेंग्यूच्या साथ आली आहे. ठिकठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे. विशेषत: दाटीवाटीच्या वसाहतींमध्ये असे रुग्ण मोठय़ा संख्येने आहेत. काहींचे निदान होते तर काहींचे होत नसल्याची स्थिती आहे. शहरातील आठ ते दहा रुग्ण धुळे येथे उपचार घेत आहेत. त्यात लहान मुलांचा सर्वाधिक समावेश आहे.
पालिकेने तातडीने डास प्रतिबंधक धुरळणी व फवारणी करावी अशी मागणी होत आहे. आरोग्य विभागाने देखील तातडीने सव्र्हे करून नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी करण्यात येत आहे.