नवापुरनंतर नंदुरबारातही डेंग्यूची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:41 IST2019-09-27T12:41:02+5:302019-09-27T12:41:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर हिवताप विभागाने गुरुवारी बागवान गल्ली व आंबेडकर चौक ...

Dengue infection also spreads in Nandurbar after Navapur | नवापुरनंतर नंदुरबारातही डेंग्यूची लागण

नवापुरनंतर नंदुरबारातही डेंग्यूची लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्ण आढळून आल्यानंतर हिवताप विभागाने गुरुवारी बागवान गल्ली व आंबेडकर चौक परिसरातील संशयित रुग्णांचे रक्तनमुने संकलित केल़े यातील एकाचे नमुने पॉङिाटिव्ह आले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत़  
शहरातील नवनाथनगर, बागवान गल्ली, आंबेडकर चौक, साक्रीनाका या परिसरासह अनेक भागात डेंग्यूचे रुग्ण संशयित रुग्ण आढळून आले होत़े मंगळवारी  आठ ते दहा जणांना धुळे येथे सरकारी व खाजगी रुग्णांलयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. पालिका व हिवताप विभागाना माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी दिवसभरात या भागात रक्त नमुने तपासणी मोहिम राबवण्यात आली़ जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ रविंद्र ढोले यांच्या मार्गदर्शनात पथकाने 31 जणांचे रक्तनमुने तपासल़े यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आह़े त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आह़े दरम्यान या भागात हिवताप कर्मचा:यांकडून जनजागृती सुरु होती़ 
याबाबत डॉ़ ढोले यांनी सांगितले की, शहरातील एका रुग्णाला डेंग्यूची लागण झाली आह़े त्याच्यावर उपचार सुरु असून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत़

दरम्यान हिवताप विभागाकडून नवापुर शहरातील शास्त्रीनगर भागात रक्तनमुने संकलित करण्याचे काम  गुरुवारी हाती घेण्यात आल़े घेतलेल्या 23 नमुन्यांपैकी एकास डेंग्यूची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आह़े  
डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यानंतर गुरुवारी सायंकाळी नंदुरबारात नगरपालिकेकडून धूरळणी व फवारणी करण्यात आली़ आंबेडकर चौक आणि बागवान गल्लीत धूर फवारणी करुन साठा केलेल्या पाण्यात औषधे टाकण्यात आल़े 
 

Web Title: Dengue infection also spreads in Nandurbar after Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.