नवापुरात डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 12:20 IST2019-09-23T12:20:03+5:302019-09-23T12:20:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : शहरातील डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा बळी गेल्याची घटना घडली आह़े शहरात डेंग्यूसदृश तापाचे थैमान ...

नवापुरात डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : शहरातील डेंग्यूसदृश तापामुळे दोघा बालकांचा बळी गेल्याची घटना घडली आह़े शहरात डेंग्यूसदृश तापाचे थैमान सुरु असून 40 पेक्षा अधिक रुग्ण गुजरात मधे उपचार घेत असल्याने शहरासह तालुक्यात नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
फरहान मकराणी हा बारा वर्षीय बालक डेंग्युमुळे शनिवारी सायंकाळी दगावला. दुपारी त्याला व्यारा (गुजरात) येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सायंकाळी सातच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. घरात एक मुलगा व एक मुलगी असलेल्या मकराणी दाम्पत्याचा लाडका व एकुलता एक मुलगा मरण पावल्याने परिवाराचा आक्रोश मन हेलावणारा होता. अब्दुल खालीक महंमद माकडा (17) यास डेंग्युची लागण झाली होती. शुक्रवारी मध्यरात्री शौचविधीस जाऊन आल्यानंतर त्यास भुरळ येऊन तो पडल्याने त्याचे मेंदु रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यु झाला. त्याचे पिता महंमद माकडा यांनाही डेंग्युची लागण झाली असुन त्यांनाही बारडोली येथे हलविण्यात आले आहे. फरहान मकराणी राहत असलेल्या गल्लीतील इतर चार बालक व्यारा येथे डेंग्युचा उपचार घेत आहेत. दोन दिवसात दोन कोवळी मुले मृत्यूमुखी पडल्याने शहर सुन्न झाले आहे. नारायणपूर रोड व शास्त्रीनगर या लागुन असलेल्या भागात या घटना घडल्या आहेत. शहरातील नारायणपूर रोड, धडधडय़ाफळी, शास्त्रीनगर, शितल सोसायटी आदी भागात डेंग्युने आपले डोके वर काढले आहे. व्यारा येथील बालरोग तज्ञाकडे शहरातील 25 रुग्ण दाखल आहेत. बारडोली येथील एक खाजगी दवाखान्यात दाखल 7 रुग्णांपैकी चार बालकांना आज सुटी देण्यात आली तर इतर तीन उपचारात आहेत. तेथीलच एक अन्य खाजगी रुग्णालयात 12 रुग्ण दाखल आहेत. सुरत येथे वेगवेगळ्या रुग्णालयांमधेही अनेक रुग्ण डेंग्युचाच उपचार घेत आहेत. शहरातील नगरसेवकाचा 15 वर्षीय बालकाचाही त्यात समावेश आहे. डेंग्युमुळे बालकांचा जीव गेल्याने हळहळ व संताप व्यक्त होत आहे.
शहरात सफाईचे तीन तेरा झाले असुन पावसाच्या सातत्याने त्यात वाढ होत आहे. उपाय योजना म्हणून आज शहरातील काही भागात औषध फवारणी सुरु करण्यात आली.
दरम्यान नवागाव ता़ नवापुर येथेही डेंग्यूने कहर केला आहे. याठिकाणी तब्बल 17 रुग्ण डेंग्युची लागण झालेले आढळून आल़े याबाबतची माहिती आमदार सुरुपसिंग नाईक यांनी प्रशासनाला कळवली़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयाचे पथक नवागाव येथे दाखल झाल़े येथील काही खाजगी तर काही शासकीय रुग्णालयात दाखल आहेत़