फीट इंडिया उपक्रमांतर्गत प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:50 IST2019-12-13T11:50:29+5:302019-12-13T11:50:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आयुष्यात जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्य चांगले होईल, असे प्रतिपादन ...

Demonstrations under the Feet India initiative | फीट इंडिया उपक्रमांतर्गत प्रात्यक्षिके

फीट इंडिया उपक्रमांतर्गत प्रात्यक्षिके


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आयुष्यात जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्य चांगले होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हा क्रीडा विभागामार्फत जिल्ह्यात १२ ते १८ डिसेंबरदरम्यानच्या फिट इंडिया चळवळ सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते़ एकलव्य विद्यालयात हा कार्यक्रम झाला़ प्रसंगी विद्यार्थिनींनी विविध योग प्रात्यक्षिके करुन लक्ष वेधून घेतले़
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, डॉ. कांतीलाल टाटीया उपस्थित होते. प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले़ पुढे बोलताना जिल्हाधिकारी डॉ. भारुड म्हणाले की, आजच्या युवा पिढीने टी.व्ही. मोबाईलमधील खेळांच्या आहारी न जाता, मैदानी खेळाला प्राधान्य देवून त्यात प्राविण्य मिळवावे यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होण्यास नक्कीच मदत होईल़ कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शाळांमधील क्रीडा शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील पाटील यांनी तर आभार संतोष पाटील यांनी मानले़
उपक्रमांतर्गत १३ रोजी जिल्हा क्रीडा संकुलात पारंपारिक खेळ व कवायत, १४ रोजी नेहरु पुतळ्याजवळील तालुका क्रीडा संकुलाच्या नियोजित मैदानावरुन सकाळी साडेसात वाजता रॅली, १५ रोजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात क्रीडा शिक्षक व खेळाडूंसाठी चर्चासत्र, १६ रोजी यशवंत विद्यालयात जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धा, १७ रोजी धुळे चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान सायकल रॅली तर १८ रोजी जिल्हा क्रीडा संकुलात स्वच्छता मोहिम होणार आहे़ यात जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभागी होण्याचे कळवण्यात आले आहे़

Web Title: Demonstrations under the Feet India initiative