पीककर्ज व कर्जमाफीसाठी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:35 IST2020-06-23T11:35:21+5:302020-06-23T11:35:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ठप्प असलेले पीककर्ज वाटप, कर्जमाफीची अंमलबजावणी बाबत उदासिनता याच्या निषेधार्थ राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे सोमवारी ...

पीककर्ज व कर्जमाफीसाठी भाजपतर्फे ठिकठिकाणी निदर्शने
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ठप्प असलेले पीककर्ज वाटप, कर्जमाफीची अंमलबजावणी बाबत उदासिनता याच्या निषेधार्थ राज्य सरकारविरोधात भाजपतर्फे सोमवारी निदर्शने करण्यात आली. यानंतर तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. याशिवाय तळोदा येथेही निदर्शने करण्यात आली.
स्टेट बँकेच्या बाहेर सोमवारी दुपारी जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली निदर्शने झाली. त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, देशाचा मालक असलेला शेतकरी महाआघाडी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात सापडला आहे. पावसाने हजेरी लावली आहे. शेत जमीनीत ओलावा आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना बि-बियाणे, खत व औषधी खरेदीसाठी पीक कर्जाची तातडीची आवश्यकता असतांना शेतकऱ्यांना चकरा माराव्या लागत आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने उत्पादीत मालाला अपेक्षीत भाव मिळाला नाही शेतकºयाने शेतीसाठी केलेला खर्च देखील निघालेला नाही. आधीच कोरोनामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झाला आहे. शेतकºयाला संकटातून बाहेर काढण्यासाठी पीक कर्ज उपलब्ध करून मागील सर्व कर्ज माफ करावे. शेतकºयांच्या बांधावर तात्काळ खते, बियाणे, किटकनाशक पुरवठा करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्यासह राजेंद्रकुमार गावीत, महेंद्र पटेल, नरेंद्र माळी, हर्षल पाटील, बुधाभाई पाटील, संजय पटेल, दशरथ पटेल, विलास पटेल आदींच्या सह्या आहेत. तळोद्यात देखील निदर्शने करण्यात आली. कार्यकर्ते उपस्थित होते.