शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सातपुडय़ातील पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:04 PM

किशोर मराठे ।  लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ातील आदिवासी संस्कृती द:याखो:यातील निसर्ग रक्षणाच्या जाणीव जागृतीसाठी सातपुडय़ातील जीवन दर्शन ...

किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ातील आदिवासी संस्कृती द:याखो:यातील निसर्ग रक्षणाच्या जाणीव जागृतीसाठी सातपुडय़ातील जीवन दर्शन व प्रदर्शनाच्या महोत्सवात पारंपरिक वस्तू, औषधी वनस्पती, पारंपरिक बियाणे व रानभाज्या अशा 99 विविध प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन मोलगी येथे भरविण्यात आले.सातपुडय़ातील जंगल हळूहळू नष्ट होत आहे. जंगलाबरोबर संस्कृती व चांगल्या प्रथा-परंपरा, सण उत्सवदेखील लोप होत चालली आहे. निसर्गाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपल्या प्रथापरंपरा जपण्यासाठी काळानुसार त्यात योग्य बदल करून त्यांची नोंदणी केली पाहिजे. ही परंपरा लोकसहभागातून निरतंर पुढे चालली पाहिजे यासाठी मोलगी येथे  सातपुडय़ातील जीवन दर्शन व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी महिलांनी डोक्यावर पारंपरिक वस्तू ठेवून पांढ:या कापडाने बांधलेल्या टोपल्या डोक्यावर घेत अग्रस्थानी  होत्या. त्यात सहभागी नवरदेव-नवरीला खांद्यावर बसवून ढोल नृत्य, हुरपोनृत्य करीत मेनरोडने काढलेली सांस्कृतिक महारॅली आकर्षण ठरली. त्यानंतर प्रदर्शनाचे उद्घाटन याहामोगी माता प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.गजानन डांगे, भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी, कृषी विज्ञान केंद्राचे राजेंद्र दहातोडे, जि.प. सदस्य किरसिंग वसावे, सरपंच मनोज तडवी, दिनकर पाडवी, सरपंच रोशन पाडवी, महेश चव्हाण, भिमसिग तडवी, फत्तेसिंग वसावे, अशोक वसावे, रूषाबाई वळवी, बहादूरसिंग पाडवी, कृष्णा वसावे, सुनील राहसे उपस्थित होते प्रास्ताविक रामसिंग दुधल्या वळवी यांनी तर सूत्रसंचालन आपसिंग वसावे यांनी केले. डॉ.गजानन डांगे, नागेश पाडवी, किरसिंग वसावे, राजेंद्र दहातोडे आदींनी प्रदर्शनाच्या आयोजकांचे कौतुक करून सातपुडय़ाच्या द:याखो:यातील संस्कृतीचे जतन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास संजय संगेकर, व्यवस्थापक रिता पाडवी, सहयोगिनी रमिला वसावे, माजी सभापती रूषाबाई वळवी, पोलीस पाटील रोता पाडवी, विकास गोडसे, गिरधर पाडवी, गणपत वसावे, शरद पाडवी, रायसिग पाडवी, रामा वसावे, विकास तडवी यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते. प्रदर्शनात एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला, जैविक विविधता व्यवस्थापन समित्या कंजाला, डेब्रामाळ, सांबर, वेलखेडी, पलासखोब्रा, कृषी विज्ञान केंद्र कोळदा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या राणी काजल लोकसंचलीत साधन केंद्र अककलकुवा, निर्भया महिला बचत गट मोलगी, बायफ संस्था शहादा, याहामोगी स्थानिक बियाणे संवर्धन समिती धडगाव, करहण माता स्थानिक गावरान संवर्धन समिती चोंदवाडे बुद्रुक यांनी या प्रदर्शन महोत्सवात प्रदर्शन व मांडणी करीत सहभाग नोदविला.