दंगा काबू नियंत्रण पथकातर्फे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:14 IST2020-03-07T13:14:14+5:302020-03-07T13:14:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : होळी, धुलिवंदन व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनातर्फे शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी दंगाकाबू पथकाने ...

दंगा काबू नियंत्रण पथकातर्फे प्रात्यक्षिक
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : होळी, धुलिवंदन व शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस प्रशासनातर्फे शुक्रवारी शहरात विविध ठिकाणी दंगाकाबू पथकाने प्रात्यक्षिक सादर करून रंगीत तालीम घेतली.
पुढील आठवड्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व शिवजजयंती असे विविध सण-उत्सव साजरे करण्यात येणार असून ते सर्व आनंदात व शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनातर्फे विशेष पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर, नगरपालिका कार्यालयासमोरील जनता चौक, गरीब-नवाज कॉलनी आदी भागात पोलीस प्रशासनातर्फे दंगा काबू नियंत्रण प्रात्यक्षिके सादर करण्यात येऊन रंगीत तालीम घेण्यात आली. शहरात अनावधानाने कुठलीही परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर योग्य नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणा सदैव कार्यरत असते. अशावेळी शांतता निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले.
या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहायक निरीक्षक दिनेश भदाणे, नीलेश वाघ, उपनिरीक्षक राजेश पाटील, भगवान कोळी, विक्रांत कचरे यांच्यासह शहादा पोलीस ठाण्यातील २० कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.